तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 March 2019

परळी-पिंपळा धायगुडा रस्त्याच्या प्रश्‍नी रस्ता रोको आंदोलन करणार्‍या 80 लोकांविरुध्द गुन्हा दाखल


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
    परळी-पिंपळा धायगुडा रस्त्याचे बंद असलेले काम सुरु करावे या मागणीसाठी परळी अंबाजोगाई रस्तयावरील शंकर पार्वती नगर जवळ 10 मार्च रोजी सकाळी 9.40 ते दुपारी 3 पर्यंत रस्ता रोको आंदोलन करुन मा.जिल्हाधिकारी दंडाधिकारी बीड यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन अनाधिकृतपणे रस्ता रोको आंदोलन केले व येणारे जाणारे वाहन थांबवून रहदारीस अडथळा निर्माण केला. अशी तक्रार परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक समाधान भाजीभाकरे यांनी दिली. त्यावरुन पोलिसांनी परळी शहर पोलिस ठाण्यात शंकर कापसे, अतुल दुबे, रवी आघाव, धनंजय फुलारी, प्रणव परळीकर, नारायण फुलारी, बालाजी सातपुते व इतर 70 ते 80 महिला पुरुष सर्व रा.शंकर पार्वती नगर व प्रिया नगर यांच्या विरुध्दात 11 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक कमलाकर सिरसाट हे करीत आहेत.
    परळी- पिंपळा हा 18 किमी अंतराचा सिमेंट करण्याचा रस्ता गेल्या 16 महिन्यापासुन रखडुन पडला आहे. या मार्गावर दोन्ही बाजुने रस्ता खोदुन ठेवला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मार्गावरुन तर दुचाकी चालविणे अशक्यच आहे. मोठी वाहने ही व्यवस्थीत चालविता येत नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. या मार्गावर वाहन जाताच धुराळच धुराळ उडतो. शंकर पार्वती नगर, प्रिया नगर, कन्हेरवाडी या भागातील नागरिक धुळीच्या त्रासाने वैतागुन गेले आहेत. एका कंपनीला हे काम सुटले आहे. परंतु या कंपनीने हे काम अर्धवटच सोडुन धुम ठोकली आहे. त्यामुळे दुसरी एजन्सी ही हे काम पुर्ण करण्याची तयारी दर्शवीत नाही. या वादात या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे वैतागुन या परिसरातील नागरिकांनी पाच तास रस्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याविषयी संपुर्ण परळी शहर वासियात असंतोष निर्माण झाला असुन. पहिला डांबरीकरणाचा रस्ता चांगला होता. असे म्हणण्याची वेळ आली आहे.
    या प्रश्‍नावर प्रशासन लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातुन केला असता पोलिसांनी मात्र आमच्यावर गुन्हे दाखल केले. सरकार व शासन एकच झाल्याने हे गुन्हे दाखल केले आहेत. तर न्याय मग कुणाकडे मागायचा असा प्रश्‍न शंकर कापसे यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment