तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

श्री.रामेश्वर विद्यालय केदारखेडा येथील विद्यार्थिनींना सायकल वाटप.


गणेश एन. सोळुंके (भोकरदन ग्रामीण)
--------------------------------

केदारखेडा : येथील श्री.रामेश्वर विद्यालयातील विद्यार्थिनींना मानव विकास मिशन योजने अंतर्गत श्री.रामेश्वर शिक्षण संस्थेचे सहसचिव नंदकुमार गिऱ्हे, मुख्याध्यापक एस.एन.बोर्डे यांच्या हस्ते मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी जी.आर.प्रधान, ए.एस.सोनोने, व्ही.एन.धसाळ, एन.एस.तळेकर, एम.एन.सुटे, आर.के.जाधव, के.के.शोरमारे, टी.आर.फोलने, एस.एल.गिऱ्हे, एस.बी.पोटे, ए.एन.सोनवणे, आर.टी.बटुळे, के.ए.खेडेकर, व्ही.पी.वाघ, प्रा.व्ही.यु.तांगडे, प्रा.एस.एस.आडे, प्रा.डी.जे.काळे, प्रा.मनोहर गिऱ्हे, आर.डी.पंडित, व्ही.के.कुदर, एस.आर.पंडित यांच्यासह एस.एस.गायकवाड, मिलिंद सावंत, श्रीराम मुरकुटे व पालकांची उपस्थिती होती.

अनिता प्रकाश घोलप (विद्यार्थिनी) : मी दररोज शाळेत चार किलोमिटर येणे व जाणे करत होते, त्यामुळे माझा बराच वेळ येण्या-जाण्यामध्येच जात होता. व घरी आल्यानंतर पाई चालुन खुप थकवा येत होता. मला मानव विकास योजने अंतर्गत सायकल मिळाल्यामुळे माझा दोन तास वेळ अभ्यासासाठी शिल्लक देता येईल. मी मानव विकास योजनेचे व शाळेचे खुप-खुप आभारी आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment