तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या जत्रेत चायनीज मटणाची दुकाने लावण्यात येऊ नये-व्यंकटेश शिंदे प्रशासनाने दखल घेऊन निर्बंध घालावे


परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) : हिंदू धर्मियांच्या पवित्र आस्थेच्या असणाऱ्या महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या जत्रेत चायनीज मटणाची दुकाने लावण्यात येऊ नये असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी दिला आहे.

बारा जोतिर्लिंगा पैकी पाचवे जोतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीत होणाऱ्या महाशिवरात्रीच्या जत्रे निमित्त प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी शहरात देशभरातून भावीक येतात त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होते या पवित्र आणि धार्मिक सणामध्ये मटनाची दुकाने लावून हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्याचे काम जत्रेतील व्यापाऱ्यांकडून होता कामा नये तसेच जत्रेचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना होणारा रोमिओंचा त्रास या सर्व विषयांची दखल प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी अन्यथा अणूचीत प्रकारच्या विषयी तिव्र विरोधाची भूमिका घेत शिवसेना रस्त्यावर येईल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment