तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

परळी शहरात गॅसचा स्फोटाने पोलीस जमादारासह तिघे जखमी; एक गंभीरपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
शहरातील नांदूरवेस गल्ली भागातील चुकार गल्ली येथे राहणार्‍या 45 वर्षीय इसम संतोष ताटे याने घराचे दार लावून गॅस सिलेंडर मधील गॅस खोलीत सोडला त्यास वाचविण्यासाठी पोलिसांनाही बोलविण्यात आले. घराचे दार तोडेपर्यंत संतोष याने आग लावल्याने गॅसचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती असून या घटनेत संतोष वैजनाथ ताटे हे गंभीर जमखी झाले असून त्यांना अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. 

याबाबत प्राप्त माहिती अशी की, रात्री 8 च्या सुमारास संतोष वैजनाथ ताटे यांने आपल्या राहत्या घरातील गॅसचे सिलेंडर शेजारील खोली मध्ये घेवून आपण आत्महत्या करत असल्याचे कुटूंबियांना सांगितले. प्रकार गंभीर असल्याने कुटूंबियांनी ही बाब शेजार्‍यांना सांगितली व तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले. घटनेचे गांभीर ओळखून बीट अमलदार माधव तोटेवर व जमादार बालासाहेब निवृत्ती चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. नागरीकांच्या मदतीने त्यास बाहेर येण्याचे आवाहन केले. परंतु संतोष याने घराचे दार उघडले नाही. शेवटी सबलिने दार तोडण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा संतोष याने हातातील काडीपेटी पेटविली. व आग लागताच एकच स्फोट झाला. यात स्फोटात संतोष हा गंभीर भाजला असून यात राम गंगाधरराव भातांगळे, सोमनाथ किशन ताटे व जमादार बालासाहेब चव्हाण हे जखमी झाले आहेत. संतोष याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास अंबाजोगाई येथे हलविण्यात आले असून इतर जखमीवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

बाजीराव धर्माधिकारी यांची मदत 

चुकार गल्ली भागात गॅसचा स्फोट होवून काहीजण जखमी झाल्याचे कळताच माजी नगराध्यक्ष तथा रा.काँ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर असलेल्या संतोष यास अंबाजोगाई स्वा.रा.तिर्थ रुग्णालयात हलविले. या नंतर चुकार गल्ली भागातील स्फोट झालेल्या त्या घराला लागलेली आग विजविण्यासाठी प्रयत्न केले यावेळी त्यांच्या समवेत स्वच्छता सभापती अनिल आष्टेकर, चंद्रप्रकाश हालगे, अनंत भातांगळे आदींनीही मदत केली.

No comments:

Post a Comment