तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

पुणे येथील सहकारी संस्था उपनिबंधकांच्या पत्राला महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखाधिकार्‍यांनी दाखवली केराची टोपली


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  ः-

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे हेळंब येथील शेतकर्यांना तात्काळ कर्ज देण्याचे आदेश उपनिबंधकांनी देऊनही या आदेशाला महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या शाखाधिकारी यांनी केराची टोपली दाखविली आहे. अशा मूजोरा अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी राम पाळवदे यांनी केली आहे.

 तालुक्यातील मौजे हेळंबे येथील शेतकर्‍यांनी दि.09.10.2018 रोजी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा धर्मापुरीच्या मनमानी कारभारामुळे खरीप हंगामातील पिक कर्ज मिळत नसल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. उपनिबंधक कृषीपत सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दि.30.11.2018 रोजी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत निर्देश केलेले आहेत. व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बीड यांचे दि.22 जानेवारी 2019 रोजी पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने अर्जातील  नमूद मुद्दयांबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करुन संबंधित पात्र शेतकर्‍यांना मंजूर कर्ज तात्काळ वाटप करणेस्तव कार्यवाही करुन अर्जदारास परस्पर कळविण्यात येऊन कर्ज मंजुर करण्याचे आदेश दिले आहेेत. मात्र महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या शाखाधिकारी यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.04 ऑक्टोंबर 2018 रोजी  शेतकरी सध्या अडचणीत सापडलेला आहे. सध्या तर तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असुन शेतकरी अत्यंत हलाखीच्या स्थितीत आहे. तोंडाशी आलेली पिके धोक्यात आली आहेत त्यामुळे शेतकर्‍यांच्या समोर अत्यंत भयावह संकट उभे आहे. राहिलेले असतांना मौजे हेळंब येथील शेतकरी 2018-19 च्या खरीप हंगामातील पीककर्ज पासून वंचित राहिला आहे. तरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पीककर्ज उपलब्ध करून शेतकर्‍यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी हेळंब येथील उपसरपंच राम पाळवदे यांनी निवेदनाद्वारे दि.04 ऑक्टोंबर 2018 रोजी राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रंबधक, जिल्हाधिकारी बीड, उपजिल्हाधिकारी परळी,  तहसीलदार परळी वैजनाथ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. या तक्रारीची दखल घेत उपनिबंधक कृषीपत सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दि.30.11.2018 रोजी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत निर्देश केलेले आहेत. व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बीड यांचे दि.22 जानेवारी 2019 रोजी पत्रान्वये कर्जाची उद्दष्टिये लवकरात लवकर पुर्ण करुन संबधीत तक्रारदारास कर्ज तात्काळ देण्यात यावे आदेश असतांना देखलील बँकेचे शाखाधिकारी यांनी शासनाच्या आदेशला केराची टोपली दाखविले आहे. तसेच त्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून शासनाच्या नियम व अटीला वगळून टेबला खालुन येणार्‍या रक्कमेला प्राधान्याने मंजुरी दिली असल्याचेही तक्रारदार यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. तसेच तक्रारदार यांनी म्हटले आहे की, खरीप हंगामातील पिक कर्ज प्रकरणाच्या फाईल मंजुर झाल्या  नाहीतर वरिष्ठ पातळीवर लढउभारु असे देखील त्यांनी दिलेलेेल्या पत्रकात म्हटले आहे.

******
शाखाधिकारी यांच्या कारभाराची सखोल चौकशी करा
तालुक्यातील मौजे हेळंब हे गाव महाराष्ट्र ग्रामिण बँक केडे हे गाव दत्तक आहे. बॅकेच्या शाखाधिकारी यांच्या मनमानी व गलथान कारभारामुळे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिक कर्जा पासुन अनेक शेतकरी वंचित राहण्याची वेळ आली आहे. एक फाईल देखील मंजुर होत नाही. शाखाधिकारी यांनी आपल्या सेवा कार्यकाळात केलेल्या गैरकारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी. शाखाधिकारी यांच्या गलथान कारभाराची राजकी पुढारी हे पाठराखण करीत असल्याच्या विरोधात उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागेल, असे उपसरपंच राम पाळवदे यांनी सांगीतले.

No comments:

Post a Comment