तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

महाशिवरात्री यात्रेनिमित्त भव्य पशु, अश्‍व व श्‍वान प्रदर्शन


धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार सोमवारी उदघाटन

महादेव गित्ते 
----------------------/
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.02................ प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी महाशिवरात्री यात्रेनिमित्त पंचायत समिती, नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि.04 मार्च, 2019 रोजी सकाळी 10 वाजता, तहसिल कार्यालयासमोरील मैदान, परळी वै. येथे भव्य पशु, अश्‍व व श्‍वान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात शासनाच्या विविध विभागाच्या माहीतीचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. तसेच या प्रदर्शनात लाल कंधारी, देवणी व संकरीत जातीची जनावरे तसेच जातीवंत अश्‍व (घोडा) व श्‍वान (कुत्रा) यांचा सहभाग असणार आहे, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन सौ.सरोजनीताई हालगे (न.प.नगराध्यक्षा), प्रमुख पाहुणे जि.प.सदस्य अजय मुंंडे, गटनेते वाल्मीकअण्णा कराड, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, जि.प.सदस्या सौ.रेखाताई मधुकर आघाव, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, सौ.आशाताई संजयजी दौंड, श्री.प्रदिप मुंडे, सौ.कौसाबाई बबन फड, सौ.अश्‍विनी किरवले, श्री.बाजीरावभैय्या धर्माधिकारी, दिपकनाना देशमुख, चंदुशेठ बियाणी, भाऊसाहेब नायबळ, शरदभाऊ मुंडे, सौ.प्राजक्ता भावड्या कराड, सौ.प्रियंका रोडे, संजय फड, अनिल अष्टेकर, विजय मुंडे, सुर्यभान नाना मुंडे, माऊली गडदे, माणिकभाऊ फड, राजाभाऊ पौळ आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

सदरील प्रदर्शनात भाग घेण्यासाठी पशुपालक, अश्‍व पालक व श्‍वान मालकांनी आपल्या स्पर्धक जनावरांची, अश्‍वांची व श्‍वानांची नोंदणी दि.04 मार्च रोजी सकाळी 8 ते 10 दरम्यान करावी, असे आयोजकांमार्फत कळविण्यात आले आहे. तसेच जनावरांना मालकांस आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, या सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समिती सभापती सौ.कल्पनाताई मोहनराव सोळंके, उपसभापती बालाजी उर्फ पिंटु मुंडे व सर्व पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment