तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

सन्मान कर्तृत्वाचा, गौरव कार्याचा...अभिनव विद्यालय उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी निर्माण करणारी शाळा - डॉ शालिनी कराड अभिनव विद्यालय येथे कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा थाटात संपन्न 
  

महादेव गित्ते
-----------------------------------
परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- 
    ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय परळी येथे संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून परळी तालुक्यातील कर्तबगार व कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा थाटात संपन्न झाला. या गौरव समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून परळीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ सुनिता झंवर ह्या शब्दमंचावर उपस्थित होत्या. यावेळी मंचावर गौरवमुर्ती कर्तृत्ववान महिला डॉ लता रायते, डॉ शालिनी कराड, डॉ शेख नेहा, डॉ अलका गित्ते, डॉ वीणा पारगावकर, डॉ वैशाली भावटणकर, डॉ मुदृला जबदे, नगर सेविका समशेटे, नगर सेविका अन्नपूर्णा अडेपवार, भतानवाडीच्या सरपंच रुक्मिणी भताने, परळी नगर परिषदच्या बांधकाम सभापती प्रियंका रोडे, संस्थेच्या उपाध्यक्षा गयाबाई साहेबराव फड, कोषाध्यक्ष अंजली सूर्यकांत कातकडे सह आदी उपस्थित होते. सावित्रीच्या लेकींच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिक्षणमाता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन समारंभाची सुरवात करण्यात आली. शाळेच्या वतीने सर्व कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ शालिनी कराड यांनी महिला ही अबला नसून दुर्गा आहे, आजच्या मुलींनी प्रतिकार करायला शिकले पाहिजे स्त्रियांसाठी सर्व क्षेत्र जरी खुले असले तरीहि आज स्त्रींयावर अत्याचार होत आहे भूतकाळाचे दाखले देण्यापेक्षा आजच्या वर्तमान काळातील महिलांचा आदर करणे समाजाने शिकले पाहिजे असे प्रतिपादन करुन अभिनव विद्यालय ही एक उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी निर्माण करणारी शाळा असून भविष्यातील राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला,  किरण बेदी, पि टी उषा, सानिया मिर्झा ह्या अभिनवच्या तालीमितुन तयार होतील अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी डॉ लता रायते यांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव कथन करुन मुलींनी स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी बालपणापासून स्वताचे काम स्वतः करण्याची सवय लावली पाहिजे असे प्रतिपादन केले. डाॅ शेख नेहा यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ ही संकल्पना विषद करत पालकांनी आपली जबाबदारी ओळखून मुलाला देखील परस्त्रीचा सन्मान करण्याचे संस्कार दिले पाहिजे व विद्यार्थिनीं आजच्या काळातील आपली जबाबदारी ओळखून भारतदेश महासत्ता होण्यासाठी कार्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ सुनिता झंवर यांनी गौरव सोहळ्याचे आयोजन बाबत आभार व्यक्त करत शाळास्तरावर असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सबलीकरणाचे धडे देण्याचे काम अभिनव विद्यालय करत आहे. सर्व क्षेत्रातील महिलांना एकामंचावर आणुन विचारांची देवाणघेवाण विद्यार्थी मुलींमध्ये रुजवण्यासाठी शाळा सतत प्रयत्नशील दिसून येत आहे, शाळेतील स्वच्छता, शिस्त व नाविन्यपूर्ण उपक्रम ही शाळेची खासीयत आहे असे दिसून येत आहे असे प्रतिपादन केले. यावेळी शाळेतील संगीतविभागाकडून विद्यार्थ्यांनी स्वागत गिताव्दारे स्वागत केले. या गौरव समारंभ कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेतील सहशिक्षिका ज्योती शिंदे, सूत्रसंचालन सहशिक्षिका सविता जंगले तर उपस्थितांचे आभार सहशिक्षिका अश्विनी मुंडे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment