तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 March 2019

पवार आजोबांबाबत बोलल्याने नाराज झालेल्या सुजयने भाजपमध्ये जाण्याचा घेतला निर्णय:-विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील





विखे आणि पवार यांच्यातील सत्तासंघर्ष सुरू?

मुंबई:-(आबा खवणेकर):-लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्या वडिलांबाबत वक्तव्य केले. पवार आजोबांबाबत बोलल्याने नाराज झालेल्या सुजयने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

पवारांच्या मनात विखेंबाबत द्वेष आहे. एका हयात नसलेल्या व्यक्तीबाबत बोलणे कधीही चुकीचे आहे. शरद पवार यांनी आघाडी धर्म पाळला नाही, असा आरोप राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. पवारांच्या वक्तव्यामुळे दु:ख झाल्याचे विखे यावेळी म्हणाले. पवारांनी 1991 ची गोष्ट काढण्याचा आता काहीही संबंध नव्हता असेही ते यावेळी म्हणाले.

विखे आणि पवार यांच्यातील सत्तासंघर्ष

विखे आणि पवार घराण्यातील सत्तासंघर्ष जवळपास 30 वर्ष जुना आहे. शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात दोन गट पडल्यानंतर विखेंनी नेहमीच चव्हाण यांच्या पारड्यात मत टाकले आहे. बाळासाहेब विखे पाटील यांचा नेहमीच चव्हाण यांना पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे पवार आणि विखे वादाला सुरुवात झाली. 1991 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा वाद विकोपाला केला होता. नगर मतदार संघातून  यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरुद्ध अपक्ष लढले. पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब विखे-पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांचं चारित्र्यहनन केलं, असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला.

सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही-राधाकृष्ण विखे-पाटील

या खटल्यामध्ये गडाखांचा विजय रद्द झाला, पण त्यांच्यासह शरद पवारही अडचणीत आले. गडाख व पवारांची नावे मतदारयाद्यांतून वगळण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यामुळे दोघांनाही सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी आली. दोघांचेही राजकीय अस्तित्व पणाला लागले. पवारांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. काही साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीतील काही मुद्द्यांवर बराच उहापोह झाला व अखेर सर्वोच्च न्यायालयाने पवारांना दिलासा देऊन, त्यांचे नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची मुभा दिली. गडाखांवरील बंदी मात्र कायम राहिली.

दुसऱ्या पिढीचा संघर्ष

पहिल्या पिढीतील हा संघर्ष दुसऱ्या पिढीतही दिसून आला. पवारांचे पुतणे अजित पवार आणि बाळासाहेब विखेंचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातही सत्तासंघर्ष दिसून आला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या आग्रहाने रामदास आठवले यांना शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित झालं.त्याबदल्यात राष्ट्रवादीकडून नगर दक्षिणची जागा बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय करण्यात आला होता. पण ऐनवेळी पवारांनी भूमिका बदलली. नगर दक्षिणमधून राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यात आला. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांची खासदारकी संपुष्टात आली. याला प्रत्युत्तर म्हणून विखे पाटील यांनी रामदास आठवले यांच्याविरुद्ध प्रचार केला आणि रामदास आठवले यांना पराभूत करण्यात विखे पाटील हे यशस्वी ठरले. तसेच अजित पवार अर्थमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील कृषीमंत्री असताना यांच्यातले वाद कायम समोर येत राहिले.

तिसऱ्या पिढीचा संघर्ष

बाळासाहेब विखेंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यास शरद पवार आले नसल्याने विखे-पवार संघर्षा कुठपर्यंत पोहोचले हे दिसून आले. तसेच आता दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट का पुरवावा असे म्हणत पवारांनी विखेंचा नातू डॉ. सुजय याच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादीची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे हा संघर्ष टोकाला पोहोचल्याचे दिसते.

No comments:

Post a Comment