तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 March 2019

लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणणारच - आ.विजय भांबळे


जिंतूर :- आज दि.०६ मार्च रोजी  नगरेश्वर मंदिर, जिंतूर येथे प्रमुख कार्यकर्त्याची बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ.विजय भांबळे यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आ.विजय भांबळे यांनी सांगितले कि, देशातील भाजप शिवसेना सरकारला लकवा झाल्याचे दिसत असून विकास पेक्षा धार्मिक उन्मादाला आणि अष्मीतेच्या प्रश्नाला अधिक महत्व देऊन जनतेची दिशा भूल केली जात असल्याचे आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेल केंद्रातील व राज्यातील नाकरत्या सरकारच्या कामगिरीचा आपण तठस्थ पाने विचार कराव आणि सर्वांनी जागे होऊन ठोस भूमिका घ्यावी.
पेट्रोल डिझेल व गसच्या  भरमसाठ दरवाढीमुळे महागाई जनसामान्याच्या आवाक्या
बाहेर गेली आहे. मा.न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे शिक्षणात व नौकऱ्यामध्ये मराठा, धनगर मुस्लीम समाजासाठी आरक्षण लागू न केल्यामुळे सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी चे गाजर दाखवून दोन वर्ष झाली अजून प्रत्यक्षात १० % सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. पीकविमा योजना, अतिवृष्टी, लाल्या, बोंडआळी, दुष्काळ, यामध्ये सरकार कडून नुकसानीचे सर्वेक्षण करून १ वर्ष होऊन सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे भाजपच्या भूलथापांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात नागरिकांमध्ये जनजागृती करून कॉंग्रेस, राष्ट्रवादी  कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीच्या उमेदवाराला जिंतूर सेलू. विधानसभा मतदार संघातून आघाडीचे संभाव्य उमेदवारास सर्वाधिक मतदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्री. राजेश विटेकर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, शेतीमालाला हमीभाव कमी झाला असून उत्पादन खर्च वाढला आहे. बी-बियाणे खत, किटकनाशक औषधी मध्ये प्रचंड दरवाढ. मोदींनी आश्वासन दिल्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्या मध्ये १५ लाख रु. जमा झाले नाही.
नोटाबंदी नंतर काळा पैसा बाहेर आलाच नाही.अरबी समुद्रात शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन होऊन बरीच वर्ष झाली असून कामास सुरवात झालेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे इंदुमील याठिकाणी भूमिपूजन होऊन बरीच वर्ष झाली असून कामास सुरवात झालेली नाही. जि/एस.टी.मुळे सर्व सामान्य व्यापारी, कारखानदार तसेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यामुळे राज्याची अर्थ व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. भाजप सेनेच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मध्ये पूर्वी पेक्षा प्रचंड वाढ झाली आहे. सततच्या दुष्काळावर सद्याच्या सरकारच दुर्लक्ष असून दुष्काळी कामे बंद आहेत. धनगर, मुस्लीम, लिंगायत, बंजारा व इतर समाजास (जुन्या आरक्षणाला धक्का न लावता) आरक्षण दिले नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाने दिलेल्या उमेदवाराला सर्वाधिक मतदान जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघातून   करण्याचे आवाहन त्यांच्या मार्फत करण्यात आले.
यावेळी मराठवाडा प्रचार प्रमुख सारंगधर महाराज, जि.प.अध्यक्ष विश्वनाथ राठोड, विधानसभा अध्यक्ष प्रसादराव बुधवंत, जि.प.सदस्य नानासाहेब राऊत, अजयराव चौधरी, बाळासाहेब घुगे, अविनाश काळे, मुरलीधर मते, अभिनय राऊत, विठ्ठल कोकरे, रामराव उबाळे, तालुकाध्यक्ष मनोज थिटे, पं.स.सभापती मधुकर भावळे, उपसभापती विजय खिस्ते, गणेशराव इलग, दिलीपराव डोईफोडे, किरण दाभाडे, प्रल्हादराव ढोणे ,सुभाष घोलप, मुंजाभाऊ तळेकर, प्रकाश शेवाळे, शरद मस्के, बाळू महाराज गायकवाड, बाबाराव ठोंबरे, संतोष भवाळ, नगराध्यक्ष कपिल फारुकी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, शामराव मते, मनोहर डोईफोडे, बाळासाहेब जाधव, दत्तराव काळे, उस्मान पठाण, शाहिद बेग मिर्झा, शोएब जनिमिया, दलमिर पठाण, शेख इस्माईल, फेरोझ कुरेशी, अहेमद बागबान, विनोद राठोड, अक्कू भाई, शौकात लाला, संदीप राठोड, पप्पू मते,  यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी  जिंतूर तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment