तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 March 2019

सेनगावात राशन दुकानदारांचा मनमानी कारभार


(गव्हु व तांदुळ सोबत तुरीची दाळ घेण्याची सक्ती)

विश्वनाथ देशमुख सेनगावकर

सेनगाव:-शहरातील राशन दुकानदारांचा मनमानी कारभार वाढतच चालला असुन होळी सण एका दिवसावरच येऊन ठेपला असुन गोरगरीबांसाठी शासनाकडुन राशन माल आला असुन तुरीची दाळ घ्या अन्यथा गव्हु व तांदुळ भेटणार नाही असा पवित्रा दुकानदारांनी घेतल्याने अनेक लाभार्थी आल्या पावलाने परत गेल्याने त्यांना होळी सणाला उपासी राहण्याची वेळ आली आहे.
सेनगाव शहरातील राशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराने कळस गाठला असुन शासन नियमाप्रमाणे लाभार्थ्यानां प्रत्येकी कार्डवरील माणसी 5 किलो धान्य मिळायला हवे मात्र त्या कार्डवर किती ही माणसे असल्यास फक्त 15 किलो धान्य मिळत असल्याच्या तक्रारीत वाढच होत असुन शासन दरापेक्षा चढ्या दराने माल दिला जातो.होळी सण एका दिवसावर आल्याने सध्या लाभार्थी राशन दुकानात गर्दी करतांना पाहावयास मिळत आहे.परंतु राशन दुकानदारांनी गव्हु व तांदुळ सोबत तुरीची दाळ ही घेण्यास सक्ती केली असुन तुरीची दाळ न घेतल्यास गव्हु व तांदुळ न देण्याचा पवित्रा घेतला असुन गोरगरीब लाभार्थ्याकडे दाळ विकत घेण्यास पैसे नसल्याने परत जावे लागण्याती दुर्दवी वेळ आली असुन त्यांना होळी सणाला उपासी राहण्याची वेळ मात्र आली. लाभार्थ्यांनी राशन माल घेतल्यास त्या मालाची पक्की पावती देखील देण्यात येत नसल्याने शासन दर किती आहेत हे ही लाभार्थ्यांना माहीती पडत नसल्याने हे राशन दुकानदार गोरगरीब लाभार्थ्यांना दिवसाढवळ्या लुटत आहेत.शासन नियमाप्रमाणे 10 किलो गव्हु व 5 किलो तांदुळाची किंमत 35 रुपये होते परंतु हे दुकानदार चक्क 60 रुपये घेत आहेत.तरी संबधीत पुरवठा अधिका-यांनी या राशन दुकानदारांची योग्य ती चौकशी करुन लाभार्थ्यांना योग्य दरात राशन माल मिळवुन देऊन राशन मालाची पक्की पावती उपलब्ध करुन देण्याची मागणी सुज्ञ नागरीकातुन होत आहे.

प्रतिक्रीया:-
शासन नियमाप्रमाणे मानसी 5 किलो धान्य मिळत असुन गव्हु 2 रुपये किलो तर तांदुळ 3 रुपये प्रमाणे दर आहेत.लाभार्थ्यांना कसल्याही प्रकारची सक्ती नसुन जे धान्य हवे ते लाभार्थी नेऊ शकतात.राशन दुकानदारांना पक्की पावती देणे बंधनकारक असुन लाभार्थ्यांना पक्की पावती न दिल्यास संबधीत दुकानदारावर कारवाई होऊ शकते.

श्री अशोक भोजणे
नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी सेनगाव

No comments:

Post a Comment