तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 March 2019

माढ्यातून शरद पवार यांची माघार...


पत्रकार परिषदेत माहिती;कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पार्थ पवार यांना संधी..._

पुणे  (प्रतिनिधी) :- ता.११:* युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी माढ्यातून उमेदवारी लढणार नाही अशी भूमिका आज राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली.पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले .
          लवकरच राष्ट्रवादीकडून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.एकाच कुटुंबातील किती जणांना उमेदवारी द्यावी असा उलट प्रश्न खुद्द पवारांनी उपस्थित पत्रकारांना केला.वास्तवतेचे भान ठेवून मी राजकारणात वागतो असेही पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment