तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 March 2019

राष्ट्रवादीचे उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर पुन्हा भाजपा नेत्यांसोबत


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ९ __ राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर शनिवारी पुन्हा एकदा भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विकास कामाच्या व्यासपीठावर दाखल झाले. ना. पंकजा मुंडे, आ. सुरेश धस, खा. प्रीतम मुंडे हे गेवराईमध्ये राष्ट्रीय महामार्ग २११ च्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थित होते.
      गेवराईत अवघ्या काही वेळामध्ये राष्ट्रीय महामार्ग २११ औरंगाबाद - येडशी या कामासह नगर परिषदेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा गेवराईमध्ये पार पडला. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.प्रीतमताई मुंडे, आ.सुरेश धस, आ.आर.टी.देशमुख, आ.भीमराव धोंडे, आ.संगिताताई ठोंबरे यांच्यासह भाजपाची टीम उपस्थित होती. कार्यक्रमाचे संयोजक भाजपाचे आमदार लक्ष्मणराव पवार हे होते. विकास कामाच्या या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते आ. जयदत्त क्षीरसागर गेवराईमध्ये दाखल झाले, ते व्यासपीठावर विजरामानही झाले. या लोकार्पण कार्यक्रमासाठी नितीन गडकरी येणार आहेत म्हणून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले होते. अलिकडच्या काळात जयदत्त क्षीरसागर यांची भाजपाच्या नेत्यांसोबत उठबस वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता क्षीरसागरांच्या भूमिकेकडे लागले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

1 comment: