तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

सर्वगुण संपन्न अष्ठपैलु व्यक्तिमत्व कला क्रिडा शिक्षक पवार यांचे हूदय विकाराने निधन पातुडर्यातील माजी विद्यार्थीकडून भावपुर्ण श्रद्धांजली
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील जि प विद्यालयावर शिक्षक गजानन पवार यांची  कला शिक्षक प्रथमच नियुक्ती झाली व यागावा पासुनच नोकरीपेशाला सुरुवात झाली तालुक्यातील सर्वात मोठे एकमेव जि प विद्यालय कनिष्ठ महाविलयातील अनेक विद्यार्थी  तत्त्वज्ञ, मार्गदर्शक असलेले शिक्षक गजानन पवार सरामुळेच घडले सोशल मिडीयाच्या माध्यमातुन आदर्श शिक्षक विद्यार्थी प्रिय शिक्षक पवार सर यांच्या  आकस्मिक निधनाची बातमी कळली आणि पातुर्डा गावावर  दुःखाचा जणू डोंगरच कोसळला. पवार सर कला शिक्षक म्हणुन जि प विद्यालयावर नियुकती  झाली होती परंतु क्रिड़ा मध्ये त्यांना विशेष रस असल्याने त्यांनी पातुर्डा येथील खेळाडू विद्यार्थीना विभागीय राज्यस्तरीय पर्यत पोहचविले क्रिडा क्षेत्रातुन आज पातुडर्यातील विद्यार्थी पोलीस, सैनिकांच्या जडणाघडणीत त्यांचा सिहाचा वाटा आहे   एक सिद्धहस्त कलाशिक्षक असलेले पवार सर सर्वगुण संपन्न एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते पातुर्डा येथील शाळेवर कार्यरत असतांना  स्काऊटर म्हणूनही त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलं . क्रीडा शिक्षकाचं पद तर आता बंदच झाल्यात जमा आहे. असं असताना सरांनी क्रीडा शिक्षकाची भूमिकाही अतिशय जीव ओतून निभावली. पातुर्डा सह जिल्हयातील अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडू घडवले. स्वतः एक दर्जेदार ॲथलीट असलेल्या. परिसस्पर्श लाभलेल्या ह्या सहृदय शिक्षकांने असंख्य क्रीडाप्रेमींच्या जीवनात आनंद निर्माण केला. गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक आणि हातोडाफेक ह्या प्रकारांमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त असलेले शिक्षक गजानन पवार  ॲथलेटिक्सच्या इतरही सर्व पैलूंवर प्रभुत्व गाजवून होते . स्वतःच्या शाळेतील खेळाडू घडवणं एवढीच मर्यादित भूमिका सरांनी कधीच घेतली नाही. चांगला खेळाडू कोणत्याही शाळेचा असला तरी त्याला त्याच तत्परतेनं मार्गदर्शन करायचे खेळाडूंसाठी नेहमीच उपलब्ध असायचे. शिक्षक आणि पालकांनाही वेगवेगळ्या स्पर्धांची माहिती द्यायचे. शाळेतल्या खेळाडूंसोबत असतानाही ते पालकांपेक्षाही जास्त मायेने पोटच्या लेकरांसारखी खेळाडूंची काळजी घ्यायचे.अभ्यास, कार्यनिष्ठा आणि अनुभवाच्या जोरावर अनेक विद्यार्थी घडवुनही. इतकं सगळं असूनही अहंकाराचा स्पर्शही भल्या माणसाला कधी झाला नाही.  निःस्वार्थी वृत्तीने आयुष्यभर काम केलेल्या आणि सतत विजयी होणाऱ्या ह्या सदाबहार खेळाडूला, प्रशिक्षकाला मृत्यूने रडीचा डाव खेळून हरवलं. पातुर्डा सह जिल्हयातील सर्व खेळाडू  पोरके झाले आहेत . कधीही भरून न निघणारी ही पोकळी निर्माण झाली आहे. पातुर्डा येथील माजी विद्यार्थीच्या वतीने स्वगीय पवार सरांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली यावेळी माजी विद्यार्थीनी स्वगीय शिक्षक पवार यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला यावेळी ज्ञानेश्वर तायडे, श्याम देशमुख, मिर मकसुद अली, किशोर दसोरे, मंगेश शेगोकार , सनाऊल्ला रवॉ, ज्ञानेश्वर अतकारे, अमजत खा , शेख इब्राहिम , रमेश दाभाडे, सह बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थीत होते 

No comments:

Post a Comment