तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 March 2019

सैन्यदलात भरती झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार

तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी 
सोनपेठ : येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे विद्यार्थी अनिल राठोड व यशवंत देवकते यांची निवड भारतीय सैन्यदलात झाली असून त्याबद्दल त्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. वसंत सातपुते प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, क्रीडा संचालक प्रा. गोविंद वाकणकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. 
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचा खेळाडू अनिल शामराव राठोड व यशवंत देवकते यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हे होते, प्रमुख पाहूणे आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील कार्यक्रमाचे संयोजक प्रा. गोविंद वाकणकर हे होते. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विठ्ठल जायभाये तर आभार प्रा. ए. के. फाजगे यांनी मानले, क्रीडा समितीच्या सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment