तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 March 2019

डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी राजेश गिते डोअर टू डोअर जाऊन गाठीभेटी
विकासाच्या मुद्यावरून प्रितमताईचा विजय निश्चित-राजेश गित्ते

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
बीड लोकसभा भाजपा-  शिवसेना- रिपाई- रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ जोरदार आघाडी घेतली आहे. भाजपा युवा नेते राजेश गित्ते यांनी परळी मतदारसंघ पिंजुन काढला असुन 
त्यांनी मतदार संघातील अनेक गावांना भेटी दिल्या.  त्यांनी घेतलेल्या काँर्नर बैठकीस उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे.
सकाळ पासुन ते रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांच्या भेटी घेऊन संवाद साधत आहेत. कडक उन्हाच्या तीव्र ते 
 राजेश गित्ते डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी डोअर टू डोअर जाऊन गाठीभेटी ह़ोत आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक वारे वेगाने वहायला सुरुवात झाली आहे. विद्यमान खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. काँर्नर बैठकीत बोलतांना गित्ते म्हणाले की,   लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्यावर आहे. राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे, विद्यमान खासदार प्रितमताई  यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात कधी नाही तेवढे विकासाची कामे झाले आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी  भाजपाच्या लोकसभा उमेदवार डॉ प्रितमताई मुंडे यांना मतदार बहुमताने निवडून देतील. असा ठाम विश्वास त्यांनी व्यकत केला. तसेच  येणाऱ्या काळातही अशीच कामे होतील हा ठाम विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. हा विश्वास सार्थ ठरवायचा असेल तर खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्याशिवाय पर्याय नाही असा निश्चय जनतेने केल्याचे चित्र ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. 

आज वडगाव दादाहारी जिल्हा परिषद गटात दगडवाडी,लोणारवाडी, कासारवाडी येथे भारतीय जनता पार्टी शिवसेना व मित्र पक्षाच्या लोकसभे च्या  अधिकृत उमेदवार खा डॉ प्रीतम ताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजपा जेष्ठ नेते नामदेवराव आघाव दादा,भाजपा युवा नेते राजेश गिते यांनी काँर्नर बैठका घेतल्या  या गावातुन व गटातून परळी वैजनाथ तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी आपण सर्व जण मिळुन एक दिलाने काम करून ताई साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून आणु असा निर्धार केला या बैठकीस  माजी पंचायत समिती सभापती प्रभाकर दादा फड, मा जिल्हा परिषद सदस्य रमेश मुंडे , भाजपा जेष्ठ नेते दिलीप आबा बिडगर, मा प स  मारोतराव फड , भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी शिंदे पाटील स सदस्य भरत सोनवणे, वडगाव सरपंच बजरंग कुकर, लोणारवाडी सरपंच नवनाथ मुंडे ,सेलु सरपंच गंगाधर सातपुते ,, कासारवाडी मा सरपंच दशरथ दादा गुट्टे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment