तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन
बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई :दि ३ मुंबई महानगर प्राधिकरण तर्फे आज मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. त्याचे उदघाटन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या संयुक्त उपस्थित झाले.
 मोनोरेलचा पहिला टप्पा चेंबूर पासून वडाळा पर्यंत पूर्वी पासून सुरू आंहे मात्र दुसऱ्या टप्प्याचा आज उदघाटन करण्यात आला आहे. दुसरा टप्पा हा वडाळा पासून संत गाडगे महाराज चौक पर्यंत राहणार आहे.  त्यात जिटीबी नगर , अॅण्टॉप हिल , आचार्य अत्रे मार्ग ,वडाळा ब्रीज , दादर पूर्व, नायगाव, आंबेडकर नगर , मिंट कलोनी, लोअर परेल आणि शेवटचे स्थानक संत गाडगे महाराज चौक आहे.  एकूण 19.54 किलोमीटर चा मोनोचा हा प्रवास उद्यापासून सर्वसामान्य लोकांसाठी खुला होणार आहे. ट्रेनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमरा संपर्क सुविधा राहणार असून रीजनरेटीव्ह ब्रेक असणार आहे त्याने 25 % विद्युत वाचणार आहे. 
या मोनोरेलमधून ३० लाख प्रवासी दर महिन्याला प्रवास करणार आहेत. भक्कम वाहतूक सुविधा असल्याशिवाय शहरे शाश्वत विकास करू शकत नाहीत आणि म्हणूनच गेल्या ४ वर्षांत वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर सरकारने भर दिला आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले अनेक प्रकल्प मार्गी लावले. येणाऱ्या काळात मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात २५० किमीचे मेट्रो नेटवर्क उपलब्ध होणार आहे. 
उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी वाहतूक सुविधांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. ही संपूर्ण प्रणाली डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि सिंगल तिकीटावर आणण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत. या प्रक्रियेत जलवाहतूक हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे! अनेक शहरांमध्ये आता इलेक्ट्रिक बसेस आणल्या जात आहेत.

No comments:

Post a Comment