तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी बरोबरच राहण्याचा खासदार राजू शेट्टी यांनी घेतला निर्णय


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई: दि.१६ नाशिक येथे शेतकरी मेळाव्यासाठी खासदार राजू शेट्टी आले असता शेट्टी यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली असता दोन नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली .राजू शेट्टी यांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रयत्न केले. हे प्रयत्न यशस्वी झाले असून खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी बरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीने कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदार संघात जाहीर पाठिंबा दिला.आता काँग्रेस वर्धा किंवा सांगली यातील एक जागा स्वाभिमानीला देणार आहे, असे ते म्हणालेत. 
मोदी सरकार शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आहे. हुकूमशाही पद्धतीने त्यांचे वागणे सुरू आहे. शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. बेरोजगारी, जीएसटी यासारखे अनेक मुद्दे भाजप सरकारच्या विरोधात आहेत, त्याचा फायदा आम्हाला निश्चित होईल, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment