तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 March 2019

परभणीत नगरसेवकाची हत्या;,आरोपी स्वत: होऊन पोलीसात हजरप्रतिनिधी
परभणी : परभणीत किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
अमरदीप यांच्यावर किरकोळ वादातून त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी हल्ला केला. रविवारी सकाळची ही घटना आहे. रवी गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावं आहेत. अमरदीप यांची हत्या केल्यानंतर आरोपी रवी गायकवाड आणि किरण ढाके हे थेट पोलीस स्टेशनला हजर झाले. हत्येचं नेमंक कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अमरदीप यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला असून शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

No comments:

Post a comment