तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

जिंतूर परंभणी राष्ट्रीय महामार्ग काम जलद गतीने करण्याची मागणी करताच "चालू असलेले काम बंद झाले"

बेमुर्वतखोर अधिकारी जबाबदार

नागरिकात संताप 

जिंतूर 
अधिकारी व ठेकेदारांच्या बेमुर्वतखोर प्रवृत्तीमुळे सद्या स्थितीत जिंतूर परभणी राष्ट्रीय महामार्गाचे काम विविध संघटना व नागरिकांनी कामाची गती वाढवा अशी मागणी करताच चक्क चालू असलेले कामच सद्या बंद केल्याच्या अवस्थेत आहे
जिंतूर ते परभणी हे ४०किमी रस्त्याचे  राष्ट्रीय महामामार्ग करण्याचे काम  सुमारे ४०० कोटी रुपये निधी मोदी सरकारने मंजूर करून परभणी जिल्ह्यात दळणवळणाची सुविधा गतीने वाढावी या उद्देशाने हे काम प्रत्यक्ष २०१७ ला सुरू केले  उद्घाटन ही झाले काही दिवस नव्हे दीड वर्ष भरा पासून हे काम सुरू आहे मात्र चालत असलेले मंद गतीचे काम व करून ठेवलेले अडथळे या मुळे सर्व सामान्य लोकांना होणारा त्रास वाढत गेला अखेर जिंतूर ता व्यापारी महासंघा सोबतच अनेक सामाजिक संघटनांनी नागरिकांनी रखडत चाललेलेे काम गतीने करा अशी मागणी करून जिंतूर तहसीलदार मार्फत  सदर काम जलद गतीने करण्याची मागणी केली खरी परंतु बेमुर्वत खोर अधिकारी आणि ठेकेदार यांनी कामाची गती वाढवण्या ऐवजी चक्क चालू असलेले काम बंद केले परिणामी सर्व सामान्य प्रवास्यांचे हाल वाढले एस टी प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करताना धुळीने माखून जात आहेत यास जबाबदार कोण असा प्रश्न आता सर्व प्रवासी विचारत आहे
अनेक अपघात घडत असून आता पर्यंत चार पाच नागरिकांचे प्राण पण गेले  वास्तविक हे काम दि २०/९/२०१७ ला सुरू झाले व १९/९/२०१९ ला पूर्ण करायचे असे वर्क ऑर्डर आहे
दैनंदीन जा ये करणारे शेकडो वाहन धारक आणि हजारो प्रवासी हा त्रास सहन करत आहेत एस टी बस चालक वाचकांचे तर कम्बर्डे मोडत आहे खिलखळ्या बस अन खराब रस्ता यामुळे तर वेळे चा अपव्यय पण खूप होतोय  या गंभीर बाबी ची दखल कोण घेईल याची मात्र सर्व नागरिक वाट पहात आहेत

No comments:

Post a Comment