तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

समाजशास्त्र विभागाचा शिक्षणसंवाद कार्यक्रम संपन्न


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथील
कै रमेश वरपूडकर महाविद्यालयात मराठा सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या शिक्षणसंवादाचे आयोजन समाजशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम  कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्रमुख पाहूणे  प्रा. तनपुरे हे होते.
शहरातील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग व मराठा सेवासंघ यांच्या संयूक्त विद्यमाने शिक्षण संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी ऊद्घाटक ह.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष मा. परमेश्वरराव कदम हे होते.'शिक्षणातील बदलते प्रवाह'या विषयावर पुरुषोत्तम खेडेकर यांनी पालकांशी संवाद साधला यावेळी मुलांचा कल,आवड लक्षात घेवून त्यांना पालकांनी करियर च्या संधी ऊपलब्ध करुन दिल्या पाहीजेत, नोकरी मिळत नाही म्हनून हताश न होता नवनविन ऊद्योग,व्यवसायातील संधिचा आपण फायदा घेतला पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाची सुरूवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली, सौ.पुष्पाताई  इंगोले, आयोजक डॉ.सुनिता टेंगसे व डॉ.सोमवंशी यांनी जिजाऊ वंदना म्हटली. या कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांनी केला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नागनाथ जाधव तर आभार शिवाजी कदम यांनी मानले.या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संखेने ऊपस्थित होते.

No comments:

Post a Comment