तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

जिल्‍ह्यात ध्वनीक्षेपक वापराबाबत आदेश लागू


परभणी,दि.15:- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दि.10 मार्च2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे.

निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवुन मोठ्या आवाजातुन प्रचार केल्यास ध्वनीप्रदुषण होणे, सर्व सामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्रीपर्यंत ध्वनीक्षेपन यंत्रणा चालु ठेवण्याची शक्यता असल्यामुळे या बाबींवर निर्बंध घालण्‍यासाठी जिल्‍ह्यात आदेश लागू केले आहेत.

परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील अधिकारानुसार निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्‍या परवानगीशिवाय करता येणार नाही, सकाळी 6.00 वाजण्यापुर्वी आणि रात्री 10.00 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही, तसेच सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि ईतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. असे निर्बंध घातले आहेत. हे आदेश निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.23.05.2019 पर्यंत) अंमलात राहतील. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.

No comments:

Post a Comment