तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर खुर्द येथील ७ वी च्या विदयार्थ्याचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न


बीड (प्रतिनिधी) :- जि प प्रा शा नागापूर खुर्द येथे इयत्ता ७वीच्या विदयार्थ्याचा निरोप समारंभाचा कार्यक्रम इयत्ता सहावी ने आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सय्यद मॅडम ह्या उपस्थित होत्या . तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे प्रथम नागरिक , सरपंच मा  श्री मसुरामजी साळुंके , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री हनुमान साळुंके , खांडे पारगांव केंद्राच्या केंद्र प्रमुख श्रीमती शेख शमा मॅडम , केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री महादेव चव्हाण , गोरख लव्हाळे , कैलास थोरात आदी मान्यवर उपस्थित होते .
         कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर    इयत्ता सहावी व इयत्ता सातवी च्या विदयार्थ्यानी उपस्थित मान्यवरांसाठी अतिशय छान असे स्वागतगीत सादर केले . त्यानंतर विदयार्थ्याची समोयचित भाषणे झाली . त्यात आदित्य साळुंके , वैष्णवी सिरसाट ,करण साळुंके , कौशल रांजणे , सुरज साळुंके , साधना साळुंके , ज्ञानेश्वरी साळुंके यांनी सहभाग नोंदवला . त्यात वैष्णवी हिने आपल्या भाषणातून शाळेविषयी मत मांडताना म्हणाले की , गाईच्या मागे फिरते वासरू व मी माझ्या जिल्हा परिषद शाळेला कसे विसरू अशा शब्दात तिने शाळेविषयीचे मत व्यक्त केले तसेच तिने  शिक्षकांविषयीही व त्यांच्या अध्यापनाविषयी खुप कौतुक केले .आम्ही या शाळेत जे काही घडलो , ते शिक्षकांमुळेच असे ठाम मत तिने व्यकत केले . 
               त्यानंतर इयत्ता सातवीच्या विदयार्थांनी शाळेसाठी भेटवस्तू दिली . त्याचा स्वीकार शाळेनी केला . त्यानंतर उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली . त्यात केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती शेख शमा मॅडम यांनी विदयार्थ्याना मौलिक असे मार्गदर्शक केले , त्यांनी विदयार्थ्याना शिक्षणातून ध्येयापर्यत कसे पोहचावावे ह्या विषयी सखोल मार्गदर्शन केले . तसेच केंद्राचे केंद्रीय मु . अ .च०हाण सर यांनी मुलांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या . शाळेचे पदवीधर शिक्षक भोसले सर यांनी ही मुलांना जीवनात कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही . त्यासाठी भरपूर कष्ट करा असे सांगितले . कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती सय्यद मॅडम यांनी अध्यक्षीय समारोप केला . त्या म्हणाल्या की ,
डर कर नौका 
पार नही होती और 
कौशिश करने वालो की हार नही होती . त्यामुळे जिवनात प्रयत्न करा असे त्यांनी सांगितले .
             संपुर्ण कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन अजित मुळूक सर यांनी यशस्वीरित्या पार पाडले . तर आभार प्रदर्शन श्रीमती छत्रबंद मॅडम यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाड़ण्यासाठी शाळेच्या मु . अ . श्रीमती सय्यद मॅडम , श्रीनिवास भोसले , अजित मुळूक , प्रज्ञा उजगरे , अयोध्या आंधळे ,  प्रतिमा छत्रबंद , अलका गेठे व इयत्ता सहावीच्या विदयार्थ्यानी परिश्रम घेतले . यावेळी इयत्ता सहावीच्या विदयार्थ्याकडून सातवीच्या विदयार्थ्याना स्नेहभोजन देण्यात आले .

No comments:

Post a Comment