तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

मनसेने जनावरांना गाजर चारून केला शासनाचा निषेध..आकाश लष्करे
उस्मानाबाद प्रतिनिधी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना उस्मानाबाद च्या वतीने दिनांक ७-३-१९रोजी शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजना करण्यात यावी, चारा छावण्या सुरू करण्यात यावा,गावोगावी पाण्याचे टॅंकर चालू करावे,रोजगार हमी योजनेतून मजूरांना कामे देण्यात यावी,दुष्काळ संचिका मराठीत करावी,जनावरांना दावणीला चारा-पाणी देण्यात यावा यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी उस्मानाबाद येथे "जनावरांना गाजरे"चारून निषेध केला यावेळी तुळजापूर शहर अध्यक्ष धर्मराज सावंत,तावरजखेडा सरपंच मुरली देशमुख,कळंब तालुकाउपाध्यक्ष अनिल बावणे,विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष समीर शेख,संजय पवार,कपील शिंदे,दिलीप राठोड,निरंजन ठवळे,यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment