तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 March 2019

ना.धनंजय मुंडेंच्या प्रयत्नामुळे पोहनेर, घाटनांदुर, नाथरा या ग्रामपंचायतींसाठी इमारती मंजुर


मुंबई दि.11.......... विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे परळी विधानसभा मतदार संघातील पोहनेर, घाटनांदुर, नाथरा या ग्रामपंचायतींच्या इमारतींच्या बांधकामासाठी मंजुरी मिळाली आहे. 

या ग्रामपंचायतींना स्वतंत्र स्वतःच्या इमारती नसल्याने गावकर्‍यांची गैरसोय होत होती. या ठिकाणी ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत उभी रहावी असे अनेक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित होती. याची दखल घेत ना.धनंजय मुंडे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून तीनही ग्रामपंचायतींसाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत इमारतींसाठी मंजुरी मिळवली आहे. 

याबाबत प्रशासन आदेश दि.8 मार्च रोजी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द झाला आहे. लवकरच या ग्रामपंचायतींच्या बांधकामास सूरूवात होऊन त्या पुर्ण केल्या जाणार आहेत. 

या ग्रामपंचायतींसाठी इमारत मंजुर करून दिल्याबद्दल तीनही गावच्या ग्रामस्थांनी ना.धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. 

आदर्श गाव खासदारांचे काम केले धनंजय मुंडेंनी


दरम्यान पोहनेर या गावाची भाजपाच्या खा.प्रितमताई मुंडे यांनी आदर्श गाव योजनेसाठी निवड केली आहे. प्रत्यक्षात या गावासाठी कोणतीच विकास कामे मात्र केली नाहीत. अखेर धनंजय मुंडे यांनीच या गावाच्या विकासाची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेत विकास कामे करण्यास सुरूवात केली असून, ग्रामपंचायत इमारतीस ही त्यांनी मंजुरी मिळवुन आणली आहे.

No comments:

Post a Comment