तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

सगळं यश माझ्या माऊलीपुढे फिकं आहे - धनंजय मुंडे यांचे महिला दिनी भावनिक ट्विट
महादेव गित्ते
-------------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.8 मार्च... आपल्याला मिळालेला कार्यक्षम आमदार पुरस्कार आपल्या आईला अर्पण करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज महिला दिनी भावनिक ट्विट केले.

माझ्या आयुष्यातील सर्वात खंबीर स्त्री माझी बाई... हिच्याकडून थोडं जरी कौतुक झालं तर अंगावर लगेच मूठभर मांस वाढते. कार्यक्षम आमदार पुरस्कार मला प्रदान केला असला तरी खऱ्या अर्थाने तो माझ्या आईचा गौरव आहे. माझं सगळं यश या माऊलीपुढे फिकं आहे. असं ट्विट करत त्यांनी आपले आईप्रति प्रेम शब्दात व्यक्त केले. आपल्या तडफदार नेतृत्वाने सरकारला नमवणाऱ्या धनंजय मुंडे यांची भावनिक बाजू या ट्विटद्वारे समोर आली.

No comments:

Post a Comment