तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

कें.प्रा.शा.हाळमचे वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नहाळम सारख्या ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांची कला कौतुकास्पद- डॉ.राजाराम मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
कें.प्रा.शाळा हाळमचे वार्षीक  स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थींनीनी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादर करण्या बरोबरच अनेक कला सादर करत उपस्थितीतांची मने जिंकली. हाळम सारख्या ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांची कला कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजाराम मुंडे यांनी केले.
या वार्षीक सन्हेसंमेलनाचे उद्घाटन डॉ.राजाराम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, तर प्रमुख पाहुणे म्हणुन हाळमचे सरपंच विनायक गुट्टे,  ग्रा.पं.सदस्य तथा युवा नेते माधव मुंडे, केंद्र प्रमुख हनुमंत फड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी गुट्टे, ग्रा.प.सदस्य सुरेश दहिफळे, सावित्रीबाई फुले शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष शाम सातपुते व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन शिक्षक शेख दस्तगीर यांनी तर प्रस्ताविक मुख्याध्यापक गोविंद टीपरसे यांनी केले. या स्नेहसंमेलनामध्ये स्त्रीभ्रण हत्या, अति थिते माती यावर आधारित नाटक सादर करण्यात आले. तसेच विविध सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले. आभार प्रदर्शन शिक्षक महादेव फड यांनी मानले. कार्यक्रमय यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment