तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 March 2019

धनुभाऊ भर उन्हात तासभर रस्त्यावर बसले परळी-अंबाजोगाई रस्ता अडवला काम न झाल्यास गडकरींच्या दारात बसणार- ना.धनंजय मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.10........................ परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम रखडल्याने संतापलेल्या महिला व नागरिकांनी परळीत आज सकाळी अंबाजोगाई रस्ता अडवला. दुपारी 1 वाजतेपर्यंत आंदोलन सूरू होते, त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे घर देखील याच रस्त्यावर असल्याने ते दखील आंदोलनात उतरले. दुपारी 11 वाजल्यापासून धनंजय मुंडे तळपत्या उन्हात रत्यावर बसले होते. अंबाजोगाई रस्त्याचे काम तात्काळ न झाल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर जावुन बसण्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला.

परळीत आज सकाळी 9 वाजता शंकर पार्वती नगर भागातील महिला व नागरिकांनी अंबाजोगाई रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ करावे या मागणीसाठी परळी - अंबाजोगाई रस्त्यावर ठिय्या मांडला. भर उन्हात महिला व नागरिक रस्त्यावर ठाण मांडुन बसले होते. जो पर्यंत प्रश्‍न मार्गी लागत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही इतर आंदोलकांप्रमाणे रस्त्यावर ठिय्या मांडला होता. तब्बल तासभर ते भर उन्हात रस्त्यावर बसून होते. या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूंची वाहतुक बरेच तास ठप्प झाली होती. प्रशासनातील एक अधिकारी आंदोलनस्थही न आल्याने दुपारी उशिरापर्यंत रास्ता रोको सुरूच राहिला.

No comments:

Post a Comment