तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

शहर व ग्रामीण भागातूनही मोदी―फडणवीस सरकारला नापसंतीकाँग्रेसच्या  जनसंपर्क व युवक काँग्रेसच्या  चलो वार्ड अभियानातील रियालिटी चेक मधील सत्य


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या भाजपाच्या मोदी―फडणवीस सरकारला शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातूनही तीव्र नापसंती मिळत आहे काँग्रेस व युवक काँग्रेस च्या वतीने बरकत नगर व परळी तालुक्यातील नंदन ज येथे आयोजिलेल्या जनसंपर्क व चलो वार्ड या अभियानात घेण्यात आलेल्या रियालिटी चेक मधून हे गंभीर वास्तव उघड झाले         परळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क व चलो वार्ड अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे युवक काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष तथा परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा विजय मुंडे काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बरकत नगर व नंदन ज येथे हे अभियान राबविण्यात आले यात शेकडो मतदारांनी शेतकऱ्यांनी युवकांनी सहभाग नोंदवून भाजपाच्या मोदी व फडणवीस सरकार बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून आगामी निवडणुकीत मोदी व फडणवीस सरकार ला पराभूत करण्याचा निर्धार केला युवक काँग्रेसच्या रिॲलिटी चेक अर्थात सत्यता पडताळणी त मोदी व फडणवीस सरकारला शून्य गुण दिले दरम्यान या अभियानाची सविस्तर माहिती प्रा विजय मुंडे यांनी सांगितले तसेच किसान कार्ड व युवाशक्ती कार्डचे वाटप करण्यात आले


       यावेळी काँग्रेसचे परळी शहर उपाध्यक्ष नितीन शिंदे मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष डॉ माणिक कांबळे अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष बबलू सय्यद युवक काँग्रेसचे परळी विधानसभा उपाध्यक्ष मनोज संकाये परळी तालुका सरचिटणीस हनुमंत गुट्टे शेख बाबा परळी शहर युवक काँग्रेसचे सचिव शंकर जोगी गुलाब पठाण फारुख भाई कालू भाई मुखीद भाई सय्यद जाहेद मनियार खाला तसेच नंदन ज येथील कार्यक्रमास डिगांबर गुट्टे राम गुट्टे हरिचंद्र गुट्टे सखाराम गुट्टे विष्णू गुट्टे मोतीराम गुट्टे शिवाजी गुट्टे महिपती गुट्टे आदीसह शहरातील व गावातील ज्येष्ठ नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment