तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 March 2019

एक महिना माझ्यासाठी,पाच वर्षे तुमच्यासाठी


अगोदर करून दाखविले म्हणुनच मागते दुस-यांदा संधी -खा.डॉ.प्रितमताई मुंडे
===============
किल्लेधारूर (प्रतिनिधी) बीड लोकसभा मतदारसंघात वर्तमान राजकिय परिस्थिती विद्यमान खासदारांना अनुकुल असल्याने डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय मुड सध्या फार्मात असुन निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या मनात त्या अगदी जोश भरताना दिसतात.काल धारूरात त्यांनी बुथ व शक्तीप्रमुखांच्या बैठकीत अचानक येवुन आढावा घेताना फक्त एक महिना माझ्यासाठी द्या.पाच वर्षे मी तुमच्यासाठी अविरत तयार असुन केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी,हाती घेतलेल्या योजना तळागाळातल्या जनमाणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करा.विकासाची चर्चा गाव पातळीवर करून मतदारांची मनं जिंका.निवडणुकीत रात्रीचा दिवस करावा लागतो.माझा निकाल आपले लोक सांगतात. त्याचप्रमाणे विरोधकसुद्धा सांगु लागले.मात्र माझ्यासाठी कार्यकर्ता हीच माझी ताकद असुन र्हदय भावनेतुन निवडणुक प्रचाराचे काम करावे असे आवाहन खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी केले.

लोकसभा निवडणुक पार्श्वभुमीवर खासदारांनी काल धारूर तालुक्यातील बुथ प्रमुख व शक्तीप्रमुखांच्या बैठकीला अचानक भेट देवुन कार्यकर्त्यांच्या सोबत संवाद केला. आ.आर.टी.देशमुख, डॉ.स्वरूपसिंह हजारी, रमेशराव आडसकर, राजाभाऊ मुंडे,राम कुलकर्णी,महादेव बडे, शिवाजी अप्पा मुंडे, अंगद मुंडे,गणेश बडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. खासदारांचा नियोजित दौरा नव्हता.मात्र कुठल्या मतदारसंघात काय चाललं आहे? हे पाहताना त्यांनी अचानक या ठिकाणी भेट देवुन संवाद साधला.सुरूवातीला त्यांनी कार्यकर्त्यांची परीक्षा घेतली.बुथ आणि शक्तीप्रमुखांनी काम करताना त्यांना योजनेची असलेली माहिती,संघटन कौशल्य,निवडणुक प्रक्रिया,मतदारांच्या सोबत संवाद कौशल्य आदी विषयांवर सांगोपांग चर्चा घडवुन आणली.मार्गदर्शन करताना त्या सरळ म्हणाल्या की मागची निवडणुक स्व.मुंडे साहेबांच्या निधनानंतर मला लढवावी लागली. त्यावेळेस मी अचानक राजकारणात आले आणि खासदार झाले.मात्र ते दिवस पुन्हा नसले तरी साहेबांचा आशिर्वाद आणि ना.पंकजाताईंची उत्कृष्ट कामगिरी ही जमेची बाजु आहे. याशिवाय पाच वर्षात बीड जिल्हा आम्ही भगिनींनी विकासाच्या प्रक्रियेत यशस्वी वाटचालीत ठेवताना सोडवलेला रेल्वेचा प्रश्न, जिल्ह्यात पसरलेले रस्ते महामार्गाचे जाळे, महाआरोग्य शिबीरं, प्रचंड कामे आणली. उद्घाटनालाही वेळ मिळाला नाही.एवढा निधी बीड जिल्ह्यात आणला.केंद्र सरकार यांनी सामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या योजना राज्य सरकारचे कामगिरी ही सर्व कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत गावपातळीवर जावुन सांगितलं पाहिजे असे त्या म्हणाल्या.कार्यकर्ता हाच आमचा केंद्रबिंदु आहे.मतदान मिळवण्याची जबाबदारी तुम्हावरच असते.खरे सैनिक तुम्ही असुन बीड जिल्ह्यातील माझ्या बहाद्दर राजकिय सैनिकांचा मला स्वाभिमान वाटतो.या निवडणुकीत यश आपणाला दिसत असलं तरी शत्रुला कधीच कमी समजले नाही पाहिजे असे धडे साहेबांनी आपणास नेहमीच दिलेले आहेत.त्यामुळे निवडणुकीत काम करताना कार्यकर्त्यांनी अगदी किंतु परंतु न करता र्हदयातुन प्रेमाने काम करावे.उपेक्षित, वंचित हा भेदभाव, एकमेकांचे हेवेदावे काढुन विरोधकांना संधी देण्यापेक्षा आम्ही भगिनी सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचं निश्चित नोंद घेतो.येणार्या काळात सर्वांना न्याय मिळेल. आता एक महिना तुम्ही माझ्यासाठी काढा.मी तुमच्यासाठी पाच वर्षे अविरत सेवेत राहणार असं सांगुन त्यांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केलं. सुत्रसंचालन अॅड. मोहन भोसले यांनी केले. तालुक्यातुन प्रमुख पदाधिकारी,बहुसंख्य सरपंच आणि बुथप्रमुख, शक्तीप्रमुखांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

आधी लगीन कोंढाण्याचे - आ.आर.टी.देशमुख
===============माजलगाव मतदारसंघाचे आ.आर.टी.देशमुख यांनी त्यांचे चिरंजीव डॉ.अभिजित या मुलाचा विवाह एप्रिल महिन्यात नियोजित काढला होता.मात्र निवडणुक जाहिर होताच विवाह त्यांनी मे महिन्यात ठेवला.या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की,आदी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे.स्वराज्य स्थापन करताना तत्कालीन काळात छत्रपतींना खंबीर साथ देणारे सैनिक असे होते. हे पण,राजकीय युद्ध असुन माझ्या दृष्टीने आदी डॉ.प्रितमताईंना विजयी करणं महत्वाचं आहे.म्हणुन आपण अभिजितचं लग्न निवडणुक लागताच पुर्वनियोजित तारीख पुढे ढकलुन आदी लगीन कोंढाण्याचे हा संदर्भ देवुन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या मनात राजकिय युद्धासाठी जोश भरला.  

===============

No comments:

Post a Comment