तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

जनसामान्याच्या हाकेला धावुन येणारा नेता नगरसेवक प्रा.पवन मुंडेपंकजाताई व प्रीतमताई मुंडे यांचा
निष्ठावान नगरसेवक प्रा पवन मुंडे.....

घरात वडिलांच्या माध्यमातून लहानपणा पासून रक्तात संचारलेला राजकीय वारसा,समाजशीलतेची ओढ व नेतृत्वाबद्दल निष्ठा या अनमोल तिन्ही गोष्टींचा संचित मिश्रण म्हणजे नगरसेवक प्रा पवन मुंडे सर....
वडील अँड. माधवराव गणपतराव मुंडे हे अंबेजोगाई पंचायत समितीचे 10 वर्ष सभापती होते,त्या काळातील त्यांचे राजकीय योगदान सर्वाना परिचित आहेच व त्या काळात लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होतीच, पण दुर्दैवाने 1992 ला त्यांचा अपघात झाला व मेंदूला मार लागल्याने त्यांच्यातील कार्यकुशलतेवर बंधने आली त्या वेळी नगरसेवक पवन मुंडे हे इयत्ता4 थी ला होते, थोरल्या 2 बहिणी व घरात सर्वात लहान पवन मुंडे , अत्यंत लहान वयात घराची जीम्मेदारी पडल्याने जीवन जगायचे बाळकडू त्यांनी लहानपणापासून च अगदी सहज पणे अंगिकारले.
     त्या काळात लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी आधार म्हणून पवन मुंडें ना आपल्या कॉलेज मध्ये नोकरी दिली,अगोदर क्लार्क मग प्राध्यापक असा प्रवास झाला, नोकरी बरोबरच गणेशोत्सव, दुरगोत्सव, निराधाराना आधार अशी सामाजिक कामे ही मित्रमंडळाच्या माध्यमातून चालूच होती, त्याच वेळी आपल्या ग्रामविकास तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी पवन चे गुण हेरले व त्याला त्यांनी सामाजीक उपक्रमाची जवाबदारी दिली,
पंकजाताई मुंडे नी "द टर्निंग पॉईंट"  या कार्यक्रमाच्या माध्यमातून परळी मतदारसंघाच्या शिरपेचात शैक्षणिक वातावरण निर्माण करणारा महान उपक्रम चालू केला व तो अत्यंत यशस्वी ठरला आणि परळीच्या लोकांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी साठी गर्दीचे विक्रम तोडले, या कार्यक्रमात पोलीस कमिशनर विश्वास नांगरे पाटील,irs भरत आंधळे, प्रख्यात विधीतज्ञ उज्वल निकम,उद्योगपती डी एस किलकर्णी,सिने अभिनेते महेश मांजरेकर, सई ताम्हणकर असे आपापल्या क्षेत्रातील प्रसिद्ध लोक विध्यार्थी ना प्रेरणावर्धक मार्गदर्शना साठी आणली, या कार्यक्रमाचे ना पंकजाताई व प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी नियोजन व संयोजन प्रा पवन मुंडे यांनी यशस्वी पणे पेलले,यातून  ना पंकजाताई मुंडें चा विश्वास पवन मुंडे च्या कार्य शैलीवर अधिकच दृढ झाला,हळूहळू प्रा पवन मुंडे ची ओळख हे पंकजाताई व खा प्रीतम ताई मुंडे च्या खास विश्वासू शिलेदारा पैकी एक म्हणून सर्वत्र झाली व ताई ने टाकलेल्या विश्वसाला तडा न जाऊ देता प्रा पवन मुंडे ताईच्या प्रत्येक राजकीय-सामाजिक उपक्रमात अगदी कळकळीने व मेहनतीने काम करत राहिले
नंतर च्या काळात  नगरपरिषदेच्या निवडणूका लागल्या त्या इलेक्शन मध्ये ताई नी पवन मुंडे च्या कार्यपद्धती वर विश्वास व्यक्त करून त्यांना उमेदवारी दिली आणि  समोर बलाढ्य व अनुभवी उमेदवार असतांना, विपरीत परिस्थितीत विरोधीपक्षाच्या लाटेत ही सुदैवाने ना पंकजाताई व प्रीतमताई यांच्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेऊन व  बलाढ्य कर्तत्वचे प्रदर्शन करत प्रा पवन मुंडें हे 400 च्या मताधिक्याने निवडून ही आले.
आज ही त्यांच्या निवासस्थानी फक्त प्रभागातील नव्हे तर शहरातील व ग्रामीण भागातील लोक आपला "हक्काचा माणूस" या नात्याने आपल्या  अडचणी व समस्या घेऊन येत असतात,बाहेर गावी असले तरी रात्री-अपरात्री जनसेवेसाठी  24 तास फोन वर उपलब्ध असणारा कार्यकर्ता,रात्रीच्या वेळी कितीही वाजता कॉल केला तर पहिल्या रिंग ला कॉल उचलून समोरच्या व्यक्ती ची समस्या जाणून सोडवायचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता म्हणून प्रा पवन मुंडे ची ख्याती आहेच व एकदा कार्यकर्त्याला दिलेला शब्द, एकदा हातात घेतलेले काम हे कालांतराने काम सांगणारा व्यक्ती जरी विसरला तरी ते काम मार्गाला लावल्या शिवाय व पूर्णकरून घेतल्या शिवाय स्वस्थ न बसणारा नेता म्हणजे पवन मुंडे अशी ओळख लोक त्यांच्या अनुभवातून मुंडे  बद्दल सांगतात,गतवर्षी  याच शिवरात्री च्या यात्रे दरम्यान परळी शहरातील रस्त्यावरील वीजपुरवठा हा नगरपालिकेने वीज बील न भरल्या मुळें महावितरण कंपनी ने पूर्ण पणे बंद केलेला होता त्या वेळी प्रा पवन मुंडे च्या नेत्रत्वाखाली भाजपा ने केलेले "टेंभा आंदोलन" व त्या साठीं जनतेने दिलेला प्रचंड प्रतिसाद हे परळीकरांच्या कायम लक्षात राहील,त्या प्रसंगी राज्यात भाजप ची सत्ता असल्याने ना पंकजाताई मुंडे यांना मध्यस्थी करायला लावून परळी शहरातील वीजपुरवठा पुर्ववत करून घेण्यात ते यशस्वी झाले,आज ही परळीतील नागरी समस्यावर ते सतत सातत्याने नगरपरिषदेत आवाज उठवीत नागरिकांच्या समस्या सोडविताना दिसतात, सांस्कृतिक,शैक्षणिक,सामाजिक उपक्रमात ते नेहमीच अग्रेसर असतात, राजकारण हे वैचारिक पणे असावे या विचारधारेचा ते नेहमी पूरस्कार करतात
आज ज्या प्रभागाचे प्रतिनधित्व ते करत आहेत त्या प्रभागातील नागरिकांचा विश्वास जिंकण्यात व संपादन करण्यात ते यशस्वी झालेले आहेत , प्रभागातील लग्न,सामाजिक उपक्रम,अंत्यविधी अशा सर्व जनतेच्या चांगल्या - वाईट प्रसंगी ते स्वतः जातीने हजर असतात तसेच नगरपालिकेत सत्ता नसतांना सुद्धा ना पंकजाताई व प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून मोठे विकासाचे जाळे तयार करण्यात ते यशस्वी झाले आहेत, प्रभागात आवश्यक तेथे रस्ते,नाल्या व अत्याधुनिक प्रकाश व्यवस्थेचे हायमास्ट लावून पूर्ण प्रभाग हा प्रकाशमय करन्याचे काम त्यांनी केले आहे,तसेच ताईच्या माध्यमातून धार्मिकदृष्ट्या प्रभागातील मंदिराचे सुशोभीकरण व मंदिरासाठी सभागृह बांधण्याचा ही त्यांचा मानस आहे,जनतेसाठी व नेत्रवाच्या उद्धारासाठी सतत तयार असणारा हा कार्यकर्ता जीवनात प्रत्येकाने दररोज किमान 1 तास वेळ जनसेवेसाठी दिला आणि आपल्या उत्पन्नतील किमान फक्त 05 टक्के रक्कम जरी जनसेवेसाठी खर्च केली तर देशभरात जनसेवे ची एक मोठी चळवळ उभी राहील,आणि त्यातून मिळणारे समाधान व आत्मभूती ही कोणत्याही भौतिक सुखा पेक्षा किती तरी मोठी आहे असे ते नेहमीच आपल्या विचारात मांडत असतात,राजकारणात काम करत असताना भरगच्च मित्रपरिवार त्यांना लाभलेला आहेच व ग्रामीण भागातील युवकांशी ही त्यांची विश्वासाची व आत्मीयतेची नाळ जुळलेली आहे,राजकारण ही एक वैचारिक लढाई आहे त्या मध्ये कोणावरही वयक्तिक द्वेष व दुजाभाव नसावा,स्व पक्षाच्या ही पलीकडे जाऊन इतर पक्षातील मित्र संपदा असणारा व्यक्ती, जीवनात आपल्या अनुपस्थितीत कोणी आपल्याला चांगले नाही म्हणले तर चालेल पण आपण वाईट आहोत असे कोणाला म्हणता येऊ नये असे कार्य असावे असे मानणारा स्व गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचार धारेवर जनसेवेचा ध्यास घेऊन  संपूर्ण जीवन व्यथित करण्याचा मानस व्यक्त करणारा व सतत ना पंकजाताई व प्रीतमताई यांच्या साठी झगडणारा योद्धा,नेत्रत्वाचे काम निष्ठतेने जनतेपर्यंत पोचवणारा व्यक्ती म्हणजे  माझा मित्र प्रा पवन मुंडे .
आज जनसेवेच्या वृत्ताने झपाटलेला नेत्रत्वाप्रति निष्ठावान असणारा माझा मित्र नगरसेवक प्रा पवन मुंडे यांना  37 वा वाढदिवसाच्या निमिताने त्यांना उदंड आयुष्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व येणाऱ्या काळात त्यांच्या हातून असेच समाजकार्य घडत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना......

जिन्दगी में इम्तेहान बहुत होंगे,
आज जो आगे हैं कल तेरे पीछे होंगे..!
बस तू चलना मत छोडना..!
बस तू लडना मत छोडना..!
...........................................................
प्रा.पवन मुंडे यांना राजकारणाच्या पलिकडे जावून काम करण्याची आवड आहे. परळी शहरातील असो किंवा त्यांच्या परिचयातील कोणीही अडचणीत असो, आपल्या जवळची व्यक्ती अडचणीत आहे अशी माहीती समजताच ते अत्यंत हिरिरिने मदतीसाठी धावून जातात. अडचण  वैद्यकीय असो, सामाजिक असो अथवा प्रशासकीय पातळीवर कोणतेही काम असो ते करण्याची त्यांची मोठी धडपड असते. शैक्षणीक क्षेत्रात त्यांचे काम मोठे वाखणण्याजोगे आहे. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक मदत तर केली आहेच, परंतू त्यांना मार्गदर्शनही ते सतत करीत असतात. अत्यंत विद्यर्थीप्रिय शिक्षक ते आज यशस्वी नगरसेवक ही त्यांनी ओळख अत्यंत अल्पावधीतच निर्माण झाली आहे. अर्थातच त्यांची स्वत:च्या कामाप्रतिची निष्ठा आणि त्यांच्याती सामाजिक ऋण परतफेडीची भावना. भविष्यात निश्चितच त्यांचे हे काम त्यांना नव्या सामाजिक आणि राजकीय उंचीवर घेवून जाणारे आहे एवढे मात्र निश्चित...
...........................................................

दत्तात्रय काळे
परळी वैजनाथ

No comments:

Post a Comment