तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

मोफत आरोग्य तपासणी शिबिरास सेलूत उत्स्फूर्त प्रतिसाद श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा उपक्रम


प्रतिनिधी
सेलू:- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, त्र्यंबकेश्वर, सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल व मेडिकल ट्रस्टतर्फे सेलू येथील महेशनगर आणि मारूतीनगर केंद्रात आयोजित मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्षण व मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे साडे नऊशेहून ( ९५० ) अधिक सेवेकरी, रूग्णांनी यांचा लाभ घेतला.
गुरूवारी दि.७ व शुक्रवारी दि.८ मार्च रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात यावेळेत डॉ.किरण शेटे, डॉ.प्रवीण जोशी यांनी रूग्णांची तपासणी करून दैनंदिन दिनचर्या, आहार, विहार  औषधोपचाराबाबत मार्गदर्शन केले. योगेश सोनवणे यांनी अत्याधुनिक बीएमआय मशीनव्दारे तपासणी केली. यात शरिरातील चरबी, पोटाच्या आतील चरबी, चयापचय क्रिया, शरिरातील पाणी, जीवनसत्त्व, ऑक्सिजनचे प्रमाण, शरिरातील पेशींचे वय, शरिरातील वस्तुमान निर्देशांक (बीएमआय) आदी चाचण्या घेण्यात आल्या.
हृदयविकार, मधुमेह, सर्व प्रकारचे कॅन्सर, त्वचा, सांधे, पोट, वात, मनोविकार, मूळव्याध, कावीळ, महिलांच्या आरोग्याविषयक समस्या यावर तज्ज्ञ वैद्यांनी मार्गदर्शन करून सल्ला दिला. शिबिराच्या यशस्वितेसाठी सेवेकरी बंधू, भगिनींनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment