तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

महिला दिनाच्या निमित्तानं करावा स्त्रीत्वाचा सन्मान - यामिनी लोहार


सुभाष मुळे..
---------------
 खरंच महिला दिवस आपण खऱ्या अर्थाने साजरे करतो. आज आपण पाहतो सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे महिलांवर जोक्स फिरत असतात. पण ते कितपत योग्य आहे ? कधी तुम्ही कल्पना केली आहे का..? तुमच्या आयुष्यातून फक्त स्त्री हे पात्र वजा केले तर तुमचे आयुष्य काय ऊरते..? कधी विचार करून बघा..? नक्की तुम्हाला आयुष्य शुन्य झाल्यासारखे लक्षात येईल.
       असं म्हणतात स्त्री घराच मांगल्य असते, स्त्री घराचा पावित्र्य असते, स्त्री घराचं अस्तित्व असते, स्त्री मुलांसाठी मातृत्व असते, महिला शून्यातून जग निर्माण करतांना सहनशिलता सृजनशीलता, नम्रता,वागण्यात सौजन्य, उत्कृष्ट अन्नपूर्णा, आणि हृदयामध्ये असतो खूप सारा स्नेह..स्त्री पारिजातकाचा सुवास असते, निरपेक्ष प्रेमाचा सागर असते,मुलांची प्रेमळ आई असते, सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या श्वासासाठी रात्रंदिवस प्रार्थना करणारी अर्धांगिनी असते, सासू-सासर्‍यांची सून नव्हे, तर मुलगी असते. नवऱ्याची  प्रेमळ मैत्रीण असते, प्रत्येक सुख दुःखात खांद्याला खांदा लावून साथ देणारी सारथी असते, तुमच्या अंगणातली पावित्र्य राखणारी तुळस असते, आपल्या परिवारातील गुणदोषांसह ती त्यांना स्वीकारते, कधी हसत, कधी रडत तर कधी राग व्यक्त करत, कधी खुप सारे प्रेम करते, वेळप्रसंगी असंख्य काटेरी संघर्ष जरी वाट्याला आला, तरी हसत आपले दुःख लपवते आणि धीरगांभीर्याने परिस्थितीशी दोन हात करते. कधीतरी एकट्यात जाऊन धो-धो पाऊस पडल्यासारखी मनसोक्त रडते. माहेरची आठवण आली आणि डोळे पाणावले तर हळूच डोळ्यांच्या कडा पुसत सांगते काय नाय रे डोळ्यात कचरा गेला होता. तिचे दुःख जणू कोणीच जाणू शकत नाही आणि हे सर्व फक्त ती आपल्या सुखी संसारासाठी कष्ट घेत असते .साऱ्यांना प्रेम आपुलकी वाटत असते, सासरच्या लोकांमध्ये माहेर शोधत असते. सासु-सासर्‍यांना -आई वडील, नणंदेला- बहीण ,दिराला -भाऊ, शेजाऱ्याला
 -मित्र, मैत्रीण मानत आपल्या संसाराला स्वर्गमय करण्याचा तिचा ध्यास असतो, हे सर्व करत असताना तिला याचेही भान नसते, कधी ती कोमल नाजुक सुकुमार असणारी- जाड, बेडौलमध्ये रूपांतरित झाली, एकेकाळी एक केस  जरी विस्कटले तरी सर्व केस परत निट होईपर्यंत आरशा समोरून न हटणारी आणि आज दोन-दोन दिवस केसांना फणी न लावणारी.. घरात कोणी आजारी पडले तर रात्र रात्र रात्र जागून काढणारी..
    मित्रांनो पण हे सर्व ती करते कशासाठी..? का..? कोणासाठी..? काय हवय ते तिला..? हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का आणि जर पडत असेल तर नक्की तुमच्यात अजून माणुसकी शिल्लक असल्याचे प्रमाण आहे.. ते अशासाठी की तुमच्या आयुष्यात असलेल्या आजीला, आईला, बहिणीला, वहिनीला, मुलीला ,मैत्रिणिला,आजही आदर देत असाल... तिला तुमच्याकडून काय हवे असते काहिच नाही.. हे सर्व संसाराच्या वेगवेगळ्या वळणावर ती करत असते ...तिला फक्त निस्वार्थ प्रेम, आपुलकी, आपलेपणा, मायेची अपेक्षा, थोडा मानसन्मान आणि तुमच्या आयुष्यात एक छोटीशी पण हक्काची जागा.. या व्यतिरिक्त तिला काही नको असतं... मित्रांनो या सर्वांसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची संपत्ती मोजावी लागत नाही, त्यासाठी लागतो मनाचा मोठेपणा ! मग काय आजपासून तिच्यासाठी वर्षभरातून एक दिवस तरी जगून बघा ती वर्षाचे ३६५ दिवस कुठल्याही प्रकारची तक्रार न करता काळाने वेळचं भान न ठेवता जगत असते, म्हणून तुम्ही आजपासून तिच्यासाठी एक चांगला मित्र, एक चांगला पती, एक चांगला भाऊ, एक चांगला पिता, बनून बघा ..त्यावेळी तो क्षण तुमच्यासाठी आणि तुमच्या नात्यासाठी नक्कीच अमूल्य आणि नवखा असल्याची प्रचिती येईल आणि तुमच्यावर ती अजून जास्त प्रेम करायला लागेल व तुमचे आयुष्य सुखकर अन् प्रेममयी करून जाईल मग काय नक्की करून बघा, बघायला काहीच हरकत नाही...या महिला दिनाच्या निमित्ताने...महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ठोकरे खाती हूँ, पर शान से चलती हूँ ।
मैं खुले आसमान के नीचे सीना तान के चलती हूँ । मुश्किलें तो सच हैं जिंदगी का आने दो। उठूंगी, गिरूंगी, फिर उठूंगी और आखिर में जितूंगी ।
 मैं यह ठान के चलती हूँ , और इसी लिए मैं यामिनी हूँ । .

प्रासंगिक..
-------------
यमिनी नलिनी लोहार.
---------------------------
╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment