तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

परळी नगर परिषदेच्यावतीने महाशिवरात्र महोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम


भाविक भक्तांना फराळ वाटप, कुस्ती स्पर्धेसह सांस्कृतिक व
देशभक्तीपर गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
बुधवारी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते महाशिवरात्र महोत्सवाचे उद्घाटन

महादेव गित्ते 
----------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी).:- दि.23 .......... 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या परळी नगरीत प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी परळी नगर परिषदेच्या वतीने या वर्षी भव्य कुस्त्यांची दंगल, भजनसंध्या, स्वरानुभूती, जागो हिंदुस्थानी या देशभक्तीपर गीतं व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परळी महाशिवरात्र महोत्सव 2019 अंतर्गत आयोजित करण्यात येत असलेल्या कुस्त्यांची दंगल, भाविकांना फराळ वाटप व 3 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते बुधवार दि.06 मार्च रोजी सायंकाळी 07 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परळी नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
नगर परिषद परळीच्या वतीने सोमवार दि.04 मार्च रोजी पासून महाशिवरात्र महोत्सव 2019 चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता नगर परिषदेच्या प्रांगणात भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. मंगळवार दि.05 मार्च रोजी दुपारी 01 वाजता अमर मैदान येथे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील कुस्ती पट्टुंसाठी आकर्षक असलेल्या कुस्त्यांच्या दंगली संपन्न होणार आहेत. कुस्ती स्पर्धेतील शेवटच्या कुस्तीपट्टु विजेत्यास 51,000 रूपये व मानाचा परळी केसरी चांदीचा गदा देऊन गौरव करण्यात येणार आहे. बुधवार दि.06 मार्च रोजी ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते 3 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये पहिल्या दिवशी सुप्रसिध्द अनुप जलोटा यांची भजन संध्या, गुरूवार दि.07 मार्च रोजी सारेगमप फेम कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, कौस्तुभ गायकवाड यांचा मराठी-हिंदी गाण्यांची स्वरानुभूती व शुक्रवार दि.08 मार्च रोजी स्वरनिनाद कोल्हापूर प्रस्तुत जागो हिंदुस्थान हा हिंदी देश भक्तीपर गीतांचे कार्यक्रम अमर मैदान येथे दररोज सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत.
तसेच नगर परिषदेच्या वतीने यात्रा नगरीत अमर मैदान येथे रहाटपाळणे, आगगाडी, मौत का कुआ, जादुगर, सर्कस अशा मनोरंजनात्मक विविध प्रकारच्या खेळणीचे दुकाने थाटले आहेत. कुस्त्यांच्या दंगली व 3 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडीयमच्या धर्तीवर आसन व्यवस्था (गॅलरी)उभारण्यात आली आहे. या कार्यक्रमास भाविक तसेच क्रिडा प्रेमी यांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष अय्युब भाई पठाण, गटनेते वाल्मीकअण्णा कराड, सर्व सन्माननीय सभापती व सदस्य, सदस्या श्री.बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी, दिपक देशमुख, शरद मुंडे, प्रियंका रोडे, प्राजक्ता कराड, अनिल अष्टेकर, संजय फड, राजश्री देशमुख, कमल कुकर, सोमनाथअप्पा हालगे, पठाण शहाजहाँ बेगम, अ.शकील कुरेशी, विजय भोयटे, गोपाळकृष्ण आंधळे, राजाखाँन पठाण, पठाण नाजेमा बेगम, किशोर पारधे, अन्वर मिस्किन शेख, शोभा चाटे, अन्नपुर्णा आडेपवार, अमृता रोडे, उर्मिला मुंडे, मीना गायकवाड, रेश्मा बळवंत, रियानाबी शेख, अजिज कच्छी, जयप्रकाश लड्डा आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment