तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ शहराच्या विविध भागात प्रचार फेरी, नागरीकांची मोठी उपस्थिती


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. 29...
      खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी शहराच्या विविध भागात भाजप - शिवसेना - रिपाइं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढुन मतदारांना झालेल्या विकास कामांची माहिती दिली. घरोघरी जाऊन ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी परळी शहर आणि वैद्यनाथ मंदिरासाठी आणलेल्या निधीची माहिती दिली. यावेळी मतदारांनी डॉ. प्रितमताई यांना प्रचंड मतांनी निवडून देणार असल्याचे सांगितले. 
      ना. पंकजाताई मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महायुतीचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सुभाष चौक,भिमवडी,सिद्धार्थ नगर,आझाद नगर,काकर मोहल्ला,जुने रेल्वे स्टेशन आदी परिसर अक्षरशः पिंजून काढला. प्रारंभी भाजपचे शहराध्यक्ष जुगरकिशोर लोहिया, विजयकुमार वाकेकर, शांतीलाल लाहोटी, शालिनीताई कराड, मंगलाताई लींगाडे, दिलीप बद्दर, भोजराज पालीवाल, नारायण सातपुते, रवींद्र परदेशी, भाऊराव भोईटे, महेश केंद्रे, प्रितेश तोतला, मोहन जोशी, पवन मोदाणी, नितीन समशेट्टी, सचिन गित्ते, अनिस अग्रवाल आदी मान्यवरांच्या हस्ते प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. 
      यावेळी सय्यद जहीर, फैसल कुरेशी, शेख अतीक , शेख़ गफ्फार,अनीस कुरेशी,हकीम कुरेशी,सय्यद चा॑द, सय्यद अनीस, शेख अय्युब, गोविंद चौरे, सुनील कांबळे, राम मुंडे,वेदांत सारडा,सुभाष सावंत,अशोक पोटभरे,अनिल कांबळे,महादेव व्हावळे,किशोर बहादूरे,बळीराम व्हावळे,शिवा व्हावळे,सिद्धार्थ उजगरे,यश खरे,संघपाल सावंत,संजय उजगरे,सचिन डबडे, बालु फड, सुनील होके,कपिल होके, राहुल गोदाम, सुनिल कांबळे, विजय व्हावळे, सचिन लांडगे, गणेश घांडगे, गंणेश लाडगे, रायभोळे, प्रतिक मस्के, चिव रोडे, मिलिंद लिद लाडगे, निखिल रायभोळे, धनदिप तरकसे, आदर्श मस्के, भिवा कांबळे, राजु कांबळे, शनी सावंत आदींसह भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मतदारांनी आमच्या सर्वांगीण विकासासाठी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून देणार असल्याचे सांगितले. 
        विद्यानगर भागामध्येही भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढुन मतदारांच्या भेटी घेतल्या व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मुंडे भगिनींनी केलेल्या कामाची माहिती दिली. या प्रचार फेरीला भाजपा जेष्ठ नेते दासु वाघमारे, योगेश मेनकुदळे, नरसिंग सिरसाट, अरूण पाठक, बालु जोगदंड , सत्यप्रकाश कराड, गोपी कांगने, प्रशान्त जोगदंड, राजेश अघाव , राहुल वाघमारे, सतीश कराड, बबलू चाटे, कृष्णा सातपुते, रोहित खाड़े, आकाश देशमुख, नरेश कुटे, किशोर तिथे, विजय हजारे, विजय चव्हाण  आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment