तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

ना. पंकजाताई मुंडे यांनी दिली राज्यातील ५३८ ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाला मंजूरी


बीड जिल्हयातील ९२ ग्रामपंचायतीचा समावेश ; लवकरच स्वतंत्र कार्यालयाचे बांधकाम होणार सुरू 

महादेव गित्ते
----------------------------
मुंबई दि. ०८ ------ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत राज्यातील ५३८ ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाला आज मंजूरी दिली असून त्यात बीड जिल्हयातील ९२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.  ग्रामविकास विभागाने मंजूरीचे आदेश  निर्गमित केले आहेत. 

  राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी नुकताच निधी मंजूर केला होता. आज त्यांनी अशा  राज्याच्या विविध जिल्हयातील ५३८ ग्रामपंचायतींच्या कार्यालय बांधकामास मंजूरी दिली असून तसे आदेश आज ग्रामविकास विभागाने निर्गमित केले आहेत. 

नाथरा सह बीड जिल्हयातील ९२ ग्रा. पं ना मंजूरी 
-----------------------------------------
ना. पंकजाताई मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नाथरा गावांसह   बीड जिल्हयातील ९२ ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाला मंजूरी दिली आहे. परळी तालुक्यातील नाथरा, पोहनेर, कासारवाडी प. व लमाणतांडा परळी येथे तर अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर, धानोरा खु., अकोला, तडोळा, अंजनपूर, तट बोरगांव, ममदापूर, जोगाईवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय बांधली जाणार आहेत. जिल्हयातील ज्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामासाठी मंजूरी मिळाली आहे, त्या तालुकानिहाय ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे, आष्टी (१०) शेकापूर, पांगरा, कारखेल बु., वंजारवाडी, नागतळा, पोखरी, मंगरुळ, हाकेवाडी, शिरापूर, चिखली, बीड - (६) अंथरवन पिंप्री तांडा, घोसापूरी, तांदळवाडी घाट, भाळवणी, मन्यारवाडी, रुई शहाजानपूर धारुर (६) कोयाळ, देवठाणा, उमरेवाडी, प दहिफळ, चोंडी, हिंगणी बु., गेवराई  (१४) नांदलगांव, वसंतनगर तांडा,  उक्कडपिंप्री, वाहेगाव आम्ली, मन्यारवाडी, गंगावाडी, ठाकर आडगाव, महारटाकळी, रानमळा, भोजगांव, कुंभेजळगांव, आहेरवाहेगांव, तळणेवाडी, मादळमोही, केज (३) दरडवाडी, रामेश्वरवाडी, सांगवी (सा) माजलगांव   (८) शिंदेवाडी, गव्हाणथडी, सिमरी पारगांव, राजेगांव, पाथ्रुड, गंगामसला, घागोरा, मंगरुळ, पाटोदा (७) सावरगांव सोने, थेरला, सावरगाव घा., गांधनवाडी, तांबाराजूरी, डोंगरकिन्ही,  नाळवंडी, कोतन, शिरुर कासार, (१७) खोपटी, सावरगाव च, टेंभूर्णी, पौंडुळ, घोगस पारगाव, तागडगांव, पाडळी, कान्होबाचीवाडी, कळमेश्वर धानोरा, वडाळी, जांब, मातोरी, ब्र. येळंब, आनंदगांव, दहिवंडी, बोरगाव चकला, येवलवाडी, वडवणी (८) कान्हापूर, पुसरा, पिंपळटक्का , हा. पिंप्री, लोणवळ बाबी, चिखलबीड, परडी मोरगांव, उपळी

No comments:

Post a Comment