तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

अखेर परळ टर्मिनसला रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला हिरवा झेंडाबाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी  
मुंबई : दि.३ गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईकर परळ टर्मिनसच्या प्रतिक्षेत होते. अखेर मुंबईकरांची प्रतिक्षा संपली आहे. परळ टर्मिनसवर सजलेल्या पहिल्या लोकलला आज रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ती लोकल कल्याणच्या दिशेला रवाना झाली. गेल्या अनेक वर्षांपासून परळ टर्मिनसची प्रवाशांमधून मागणी होती, ती अखेर आज पूर्ण झाली. कारण आजपासून परळ टर्मिनस प्रवांशांसाठी खुले करण्यात आले आहे .
 दादर स्टेशनवर दिवसेंदिवस गर्दी ही वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लोकलवर पडणारा ताण, तसेच एल्फिन्स्टन म्हणजेच आताचे प्रभादेवी स्टेशनवर झालेली दुर्घटना, परळ स्टेशनवरील वाढलेली गर्दी या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन परळ टर्मिनस उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. २०१५ या परळ टर्मिनसची घोषणा करण्यात आली होती. एल्फिन्स्टन स्थानकातील चेंगरचेंगरीच्या दुर्घटनेनंतर परळ टर्मिनस उभारण्याच्या योजनेला चालना मिळाली होती
या वेळेत धावणाऱ्या लोकल 
परळ टर्मिनसवरून १६-१६ लोकल अप आणि डाऊन मार्गावरून धावणार आहेत.परळ टर्मिनसवरून पहिली परळ लोकल ही सकाळी ८.२१ तर धिमी लोकल ८.३८ वाजता धावणार आहे. तसेच ११.०५ आणि ११.१५ वाजता शेवटची जलद आणि धिमी लोकल धावणार आहेत. परळ टर्मिनसमुळे दादर स्टेशनला होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण येणार आहे.
अत्याधुनिक सुविधा 
उपनगरीय गाड्यांसाठी परळ आणि दादर दरम्यान दोन स्टॅब्लिनग लाईन,  नवीन आयलेंड प्लॅटफॉर्म आणि जुना प्लॅटफॉर्मवर सरकते जिने व लिफ्ट , पूर्व पश्चिमेला जोडणारा १२ मीटर रुंद पादचारी पूल , डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्मसह नवीन टर्मिनस लाईन, दोन्ही प्लॅटफॉर्मवर फ्लोरिंग आणि कव्हर ओव्हर शेड, प्रशस्त अशी जागा त्यामुळे प्रवाश्यांना मुबलक जागा मिळणार 
पियुष गोयल भाषणात काय म्हणाले 
नेरळ-माथेरान गाडीमध्ये विस्टाडोम कोच , कुर्ला, शिव, दिवा, गुरू टेग बहादूर नगर, महालक्ष्मी, पालघर स्थानकावर पादचारी पूल लोणावळा, इगतपुरी स्थानकाचा पुनर्विकास पेण-थळ व जसई-उरण विद्युतीकृत लाइन
उपनगरीय मार्गावरील स्थानकात २०१४ पर्यँत ३२० पादचारी पुल होते. तर २०१४ नंतर ३२० पादचारी पूल बसवण्यात आले. तर सध्या १३० पादचारी पूलांचे काम सुरू आहे.
 २०१३-१४ मध्ये केवळ ६५० किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले. मात्र, गेल्या ४ वर्षात याच्या दहापट म्हणजेच ६ हजार किलोमीटर विद्युतीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे गोयल म्हणाले.
 २०१४ मध्ये फक्त १६ सरकते जिने होते, आता ११२ सरकते जिने बसवण्यात आले आहे. तर सध्या ३८ सरकते जिन्याचे काम सुरू आहे.
२०१४ मध्ये फक्त ३ लिफ्ट होत्या, सध्या ७८ लिफ्ट लागल्या आहेत. तर भविष्यात १७० लिफ्ट लागणार आहेत. वर्तमानात १६ लिफ्ट बसवण्याचे काम सुरू आहे.
पुणे-नागपूर साप्ताहिक हमसफर एक्सप्रेस, मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर १५ डब्याच्या अतिरिक्त २ गाड्या, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन मार्गिका, अंबरनाथ तसेच बदलापूर स्टेशनची सुधारणा या कामाची पायाभरणी यावेळी करण्यात आली. 
'या' कामांना देण्यात आली मंजुरी 
कल्याण-मुरबाड नवीन रेल्वे मार्गअंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान चिखलोली इथे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानकात १८० अतिरिक्त सरकते जिने

No comments:

Post a Comment