तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 March 2019

रोहित वाघ चे किडनीच्या आजाराने निधन


सेलू !प्रतिनिधी

 येथील श्रीराम कॉलनी मधील रामप्रसाद वाघ यांच्या नूतन महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या रोहित वाघ वय १८वर्षे या मुलाचे दोन्ही किडन्या निकामी झाल्याने शनिवार दि. ९मार्च रोजी औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी दहा वाजता निधन झाले. त्याच्यावर येथील तहसील रोड वरील शांतीधाम स्मशानभुमीत  शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत रोहित वाघ याच्या पश्चात आई ,वडील असून रामप्रसाद वाघ यांचा तो एकुलता एक मुलगा होता. दरम्यान पाच महिन्यापासून शरीरातील रक्ताचे प्रमाण दोन टक्के झाल्यामुळे रोहित ची प्रकृती खालावली होती. नांदेड व शेवटी औरंगाबाद येथील उपचारादरम्यान आजार बळावत गेल्याने दोन्ही किडन्या निकामी झाल्याने तरुण वयात  रोहित वाघ याचे निधन झाले.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment