तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 March 2019

माटेगावच्या श्रीकृष्णा एज्युकेशनचा 'दशकपुर्ती सोहळा' थाटात संपन्न


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १३ __ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गेवराई तालुक्यातील माटेगाव येथील श्रीकृष्णा एज्युकेशनचा हा दशकपुर्ती सोहळा कार्यक्रम विविध स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला होता. उल्लेखनीय म्हणजे महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून समारंभ पार पडला. 
        आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजयजी गायके हे होते. यावेळी श्रीमती टेकाळे ए.एस., सरपंच श्रीमती चव्हाण एस.बी., उपसरपंच श्रीमती काकडे एम.डी., श्रीमती आरबड जे. के., श्रीमती निसर्गंध ए.बी., श्रीमती बने आर.एस., जनाताई चव्हाण आदी मान्यवर महिलांंची उपस्थिती लाभली. दरम्यान उपस्थित मान्यवरांचे स्वागत बबन इंदे व सौ. प्रियंका इंदे यांनी "विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज" या पुस्तकांच्या प्रती देऊन केले. या स्पर्धेतील विजेते मध्ये सावित्राई जीवनकार्य इंग्रजी हस्ताक्षर - १ ली ते ४ थी गटातील प्रथम म्हणून नंदिनी विलास राऊत ( उमाई पब्लिक स्कूल ), द्वितीय आर्यन सचिन चव्हाण (श्रीकृष्णा एज्युकेशन), तृतीय - रोशनी विजय राठोड (उमाई पब्लिक स्कूल), ५ वी ते ८ वी गट - प्रथम - साक्षी उमेश औटी ( समर्थ कोचींग क्लासेस ), द्वितीय- निकीता शेषनारायण पोकळे ( श्रीकृष्णा एज्युकेशन),  तु्तीय- विद्या विज्ञानेश्वर अंदुरे ( समर्थ कोचींग क्लासेस) तसेच जिजाई जीवनकार्य मराठी निबंध स्पर्धा पहिली ते चौथी गट- प्रथम पृथ्वी सतीश शिंदे ( श्रीकृष्णा एज्युकेशन), द्वितीय - श्वेता योगीराज गरुड (श्रीकृष्णा एज्युकेशन), तृतीय. प्रथमेश चंद्रशेखर शिंदे (श्रीकृष्णा एज्युकेशन), पाचवी ते आठवी गट- प्रथम अभय बबन पोकळे ( श्रीकृष्णा एज्युकेशन), द्विती पायल अनिल इंदे (श्रीकृष्णा एज्युकेशन), तृतीय उज्वला रमेश शेंबडे (माध्यमिक विद्यालय खळेगाव ) गणित पाढे स्पर्धा - पहिली ते चौथी गट - प्रथम पृथ्वी सतीश शिंदे (श्रीकृष्णा एज्युकेशन), अक्षरा विजय गायकवाड (श्रीकृष्ण एज्युकेशन), संस्कार दत्तात्रय चव्हाण (श्रीकृष्णा एज्युकेशन ), पाचवी ते आठवी गट - प्रथम प्रथमेश बाळासाहेब आहेर (माध्यमिक विद्यालय खळेगाव), द्वितीय पायल अनिल इंदे (श्रीकृष्णा एज्युकेशन), तृतीय रेणुका गणेश परजने (माध्यमिक विद्यालय खळेगाव ), छत्रपती शिवाजी महाराज जीवनाकार्य वकृत्व स्पर्धा- पहिली ते चौथी गट- प्रथम आर्यन सचिन चव्हाण (श्रीकृष्णा एज्युकेशन ), संस्कार दत्तात्रय चव्हाण (श्रीकृष्णा एज्युकेशन), अर्णव सोपान टेकाळे (श्रीकृष्णा एज्युकेशन ),  पाचवी ते आठवी गट- प्रथम ज्ञानेश्वरी सुदाम दिलवाले (समर्थ कोचिंग क्लासेस ), द्वितीय गायत्री संतोष दिलवाले (समर्थ कोचिंग क्लासेस), तृतीय सारक भास्कर कदम (श्रीकृष्णा एज्युकेशन), याचबरोबर रात्री ९ ते ११ या वेळेत श्रीकृष्णा एज्युकेशनच्या माजी विद्यार्थीनी बालकीर्तनकार श्रुति दिदी महाराज  शिंदे यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. 
         दरम्यान या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. ज्ञानेश्वरजी काकडे, श्री. सुभाषजी मुळे, श्री. राधाकिसनजी गवारे, श्री. रघुनाथजी नावडे, श्री. डॉ. कपिलजी सोडाणी, सिध्देश्वरजी वायकर, श्री. विश्वंभरजी टेकाळे, श्री. विठ्ठलजी यादव, श्री. परमेश्वरजी शिंदे, श्री. गितारामजी शिंदे, श्री. योगीराजजी चव्हाण, सुधाकरजी गरूड, श्री. वशिष्ठजी चव्हाण, श्री. प्रल्हादजी यादव, श्री. बाबुरावजी आटपळे, श्री. विठ्ठलजी कदम आदींचे सहकार्य लाभले. प्रारंभी या समारंभाचे प्रास्ताविक श्री. बबन इंदे यांनी केले. 
     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह.भ.प. पांडुरंग महाराज जाधव, श्री कैलासजी आरबड सर, श्री संदिपजी चव्हाण सर, श्री सोपानजी टेकाळे सर, श्री महेंद्रजी खराद सर, रमेशजी शिंदे, श्री गौरवजी चव्हाण, श्री. चंद्रकांतजी टेकाळे,रंजीतजी देशमुख, श्री बाळासाहेब खरात, श्री नामदेव चौधरी, अदिनाथजी मिसाळ, श्री दादासाहेबजी गरूड, श्री दत्तात्रयजी चव्हाण, श्री गणेशजी शिंदे, श्री अभिजितजी इंदे श्री अनिकेतजी इंदे याचे खूप मोठे योगदान लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री कैलासजी आरबड सर यांनी केले तर सर्व उपस्थितांचे श्रीमती इंदे प्रियंका बबन यांनी मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment