तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 March 2019

बारावी मधील गुणवंत कामगार पाल्याचा पाच हजार रुपये देऊन गौरव कामगार कल्याण मंडळाचा  उपक्रम 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी बारावी मध्ये विशेष गुण संपादन करणाऱ्या कामगार पाल्यांचा   विशेष गौरव करण्यात येतो.
 यावर्षी परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यांमधील कामगार सुभाष कोरे यांचा पाल्य धनराज कोरे यांनी इयत्ता बारावी मध्ये ९६.१० टक्के गुण मिळविल्याबद्दल कामगार कल्याण मंडळातर्फे नुकतेच लातूर येथे पाच हजार रुपयाचे पारितोषिक देऊन त्याचा  सत्कार करण्यात आला.  धनराज कोरे यांची गुणवंत विद्यार्थी म्हणून निवड झाल्याबद्दल परळी येथील कामगार कल्याण केंद्राच्या वतीने धनराज कोरे व त्यांच्या  पालकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्र संचालक आरेफ शेख,  उमा ताटे उपस्थित होते. 
 कामगार कल्याण मंडळातर्फे नेहमीच कामगार व कामगार पाल्यांना विशेष प्रोत्साहन देण्यात येते. बारावी मध्ये विशेष गुण संपादन केल्याबद्दल कामगार कल्याण मंडळाच्या वतीने धनराज कोरे यांचा सत्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment