तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 March 2019

पाथरीत विद्युत रोहित्राचा स्फोट;लाईनमन गंभीर जखमी


प्रतिनिधी
पाथरी:- शहरात सध्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवली जात आहे. पाथरी शहरात ही  मोहीम चालू असताना विद्युत रोहित्र बंद करण्यास गेलेला लाईनमन रोही त्राचा स्फोट झाल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना 18 मार्च रोजी घडलीय .
शहरातील थकबाकीदार यांचा   विद्युत पुरवठा खंडीत करण्यासाठी  महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एन .ए. रायपुरे व त्यांचे पथक पंचायत समिती परिसरात दाखल झाले होते . यावेळी तेथील रोहीत्रातील फ्युज काढण्यासाठी लाईनमन  लक्ष्मण नेरूळ ( वय 30 ) गेले असता फ्युज काढत असताना फेज टू फेज झाल्याने विद्युत रोहीत्राचा मोठा आवाज होत स्फोट झाला यामध्ये सदरील कर्मचाऱ्याचा चेहरा भाजला असुन त्याला उपचारासाठी परभणीला हलवले आहे .
    जिल्हातील ग्रामीण व शहरी भागातील विद्युत रोहीत्रांचे अत्याधुनिक पणे तर सोडाच पण फ्युज बॉक्सला  साधे दरवाजे पण नसल्याने बहुतेक विद्युत रोहीत्र हे मृत्युचे सापळे बनले आहेत.

No comments:

Post a Comment