तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यास निर्बंध


परभणी, दि.16 :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दिनांक.10 मार्च 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आल्याने परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याची  खात्री झाली असून त्यावर एकतर्फी आदेश काढून निर्बंध घालण्यात आले आहेत.

परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर,  यांनी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की,  सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा,निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.23/05/2019 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे  एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी. असेही आदेशात नमुद केले आहे.

No comments:

Post a Comment