तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरील अन्यायकारक गुन्हे रद्द करा - बाजीराव धर्माधिकारी


परळी-अंबाजोगाई रस्त्यासाठी न्याय मागणारांवरच कायद्याचा बडगा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
       परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडल्याने संतापलेल्या महिला व नागरिकांनी परळीत ठिय्या धरत लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन केले. नागरीकांच्या प्रश्नांवर कायमच उदासीन दिसणार्‍या प्रशासनाने मात्र तत्परतेने न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या सर्व सामान्य महिला,विद्यार्थी, नागरीक यांच्यावर गुन्हे दाखल केले. न्याय मागणारांवरच कायद्याचा बडगा उगारुन अन्याय होत असून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरील गुन्हे तात्काळ  रद्द करा अन्यथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली याबाबत व्यापक आंदोलन  करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिला आहे. 
        परळीत १० मार्च रोजी अंबाजोगाई रस्त्यावरील शंकर पार्वती नगर भागातील महिला व नागरिकांनी रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ करावे या मागणीसाठी परळी - अंबाजोगाई रस्त्यावर ठिय्या मांडला. भर उन्हात महिला व नागरिक रस्त्यावर ठाण मांडुन बसले होते. जो पर्यंत प्रश्‍न मार्गी लागत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा या त्रस्त नागरिकांनी घेतला होता.वास्तविक या रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत असलेला जनतेचा रोष व असंतोष बघता प्रशासनातील अधिकार्‍यांनी गांभीर्याने तर घेतलेच नाही उलट दुपारी उशिरापर्यंत एकही अधिकारी आंदोलनस्थळी  न आल्याने उशीरापर्यंत रास्ता रोको सुरूच राहिला. 
         नागरीकांच्या न्याय मागण्या गांभीर्याने घेण्याऐवजी तसेच तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची तत्परता दाखवण्याऐवजी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना गुन्हे दाखल करुन मुस्कटदाबी केली जात आहे. न्यायासाठीरस्त्यावर उतरलेल्या सर्वसामान्य महिला, विद्यार्थी, नागरीक यांच्यावर गुन्हे दाखल केले. हा अन्याय कदापिही सहन केला जाणार नाही. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरील गुन्हे तात्काळ रद्द करा अन्यथा व्यापक आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस परळी वैजनाथ  यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment