तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

चंदा जमा न करता साजरा होणार पाथरीत ऊर्स मोहत्सवकिरण घुंबरे पाटील
न प सभागृहात न प गट नेते जुनेद खान दुर्रांनींच्या उपस्थितीत बैठक संपन्न.

१० दिवस चालना-या कार्यक्रमा साठी विविध समित्यांची स्थापणा. 
पाथरी:- सार्वजनिक जयंती, उत्सव साजरे करायचे म्हटले की समिती स्थापण झाली की लागलीच त्या साठी किती खर्च येतो याचा अंदाज बांधून नंतर तो अक्षरश: "वसूल" केला जातो अशा वेळी इच्छा नसतांनाही अवास्तव मागणी केलेला चंदा देणे काही वेळा भाग पडते. यात काही वेळा प्रतिष्ठीत मंडळी यांना पुढे करून "वसुली" होते. हिशोबाला मात्र नाक मुडले जाते तशी हिशोब विचारण्याची कोणी मजाल ही करत नाही म्हणा. मात्र असा चंदा आता पाथरीत प्रती वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणा-या साजरा होणा-या उर्सा साठी या वर्षी पासून जमा न करण्याचा स्तूत्य निर्णय घेऊन या वर्षीच्या उत्सवा साठी शनिवारी न प सभागृहात विविध समित्यांची स्थापणा करण्यात आली.

या वर्षीचा उर्स  "शरीफ हाजरत सय्यद सादात (रहे) पाथरी". चा उर्स मोहत्सव १४ मार्च पासुन सुरू होत असून  आ बाबाजानी दुर्रानी यांच्या मार्गदर्शनात आणि न प गट नेते जुनेद खान दुर्रानी यांच्या नेतृत्वात हा उर्स मोहत्सव पार पडणार आहे. या साठी शनिवारी २ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता न प सभागृहात गट नेते  जुनेद खान दुर्रानी यांच्या अध्यक्षते खाली शहरातील विविध क्षेत्रातील मंडळींच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.यात शहरवासियां कडून कोणताही चंदा न घेता राकाँ पदाधिकारीच या वर्षी पासून स्वत: सर्व खर्च उचलत हा उर्स मोहत्सव पार पाडणार असल्याचे या वेळी न प गट नेते जुनेद खान दुर्रानी यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या बैठकीत सर्वानुमते उर्स कमेटी अध्यक्ष पदी नगरसेवक गोविंद हरकळ, उपाध्यक्ष पदी नगरसेवक मुख्तार अली, कोषाध्यक्ष पदी कृउबास सभापती अनिलराव नखाते, सचिव पदी नगरसेवक सतिष वाकडे, सहसचिव पदी नगरसेवक साजेदअली राज, स्वागताध्यक्ष पदी न प गट नेते जुनेद खान दुर्रानी, संदल कमेटी, माजी नगराध्यक्ष एम ए मोईज मास्टर, उपाध्यक्ष हामिद शहा,नियाज कमेटी अध्यक्ष  रौफ मामू, उपाध्यक्ष हबीब अन्सारी, अतिषबाजी कमेटी, अध्यक्ष नगरसेवक अलोक चौधरी, उपाध्यक्ष नगरसेवक एजाज खान, कव्वाली कमेटी अध्यक्ष किरण भाले, उपाध्यक्ष इरफान शेख, जेरे इंतजाम कमेटी अध्यक्ष सगीर अन्सारी, उपाध्यक्ष माजी उप नगराध्यक्ष रफिक अन्सारी, प्रसिद्धी कमेटी अध्यक्ष किरण घुंबरे, उपाध्यक्ष हाफिज बागवान, पाशा बेग. यांची नियुक्ती करण्यात आली.१४मार्च रोजी रात्री ९ वाजता आतषबाजी ने या उर्स मेहत्सवाले सुरूवात होणार आहे. आणि दहा वाजता संदल निघणार आहे. पंधरा मार्च रोजी सकाळी सहा वाजता दर्गा शरीफ या ठिकाणी महाप्रसाद होणार आहे.तर सतरा मार्च रोजी ,सायंकाळी दहा वाजता कव्वालीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दर वर्षी उर्सा निमित्ताने पाथरी शहरात चंदा गोळा केला जात होता. मात्र या वर्षी पासून उर्सा साठी चंदा गोळा करणार नसल्याचे उर्स कमेटीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले न प गट नेते जुनेद खान दुर्रानी यांनी या वेळी घोषित करून ही सर्व जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी सांभाळतील असे सांगितले. त्या मुळे शहरातील प्रतिष्ठाण धारकांना हायसे नक्कीच वाटले असनार. या वेळी "उर्स शरीफ हाजरत सय्यद सादत (रहे) पाथरी" साठी नियुक्त केलेल्या विविध समित्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिका-यांचा  जुनेद खान दुर्रांनी यांनी सत्कार केला. 

थोरात यांचा सत्कार-

राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ठ शेतकरी म्हणून २०१५ चा शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष सदाशिव थोरात यांना मिळाल्या बद्दल पाथरी नगरपकिषदेच्या वतीने जुनेद खान दुर्रांनी आणि सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती,नगरसेवक यांनी शाल श्रीफळ देऊन केला.

या बैठकी साठी नगराध्यक्ष नितेश भोरे, उपाध्यक्ष हन्नान खान दुर्रानी आणि विविध विषय समित्यांचे सभापती ,नगरसेवक आणि राकाँचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment