तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 March 2019

पक्ष्यांचा उन्हाळाही करूया सुसह्य - प्रसाद देशमुखरिसोड महेंद्रकुमार महाजन 

 उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढतच चालला आहे. उष्माघाताने माणसांचे बळी जाऊ लागलेत. विचार करा, ही अवस्था आपल्यासारख्या सजीवांची, तर त्या बिचा-या पशु-पक्ष्यांचं काय होत असेल. आपण उन्हाची काहिली कमी व्हावी म्हणून दिवसभर खाण्या-पिण्यातून नवनवीन प्रयोग करत असतो. कधी आइस्क्रीम, कुल्फीसारखे थंड पदार्थ खा, कधी ज्युस प्या, कधी शॉवर घ्या, कधी एसीत बसा, कधी थंड हवेच्या ठिकाणी जा.. अशा एक ना अनेक उपायांची सरबत्ती सुरू असते. पण हे पक्षी मात्र कधी तोडक्या-मोडक्या आपल्या घरटयात विसावतात, तर कधी एखाद्या पाण्याच्या डबक्यात, तर कधी अगदीच खड्डयात साचलेल्या सांडपाण्यातच काय तो शरीर थंड करण्याचा प्रयोग करत असतात. सध्या दुष्काळाची परिस्थिती आपणा कोणासाठीच नवीन नाही. इथे धरणं आटली तर या छोटया-छोटया डबक्यांची काय बात!
उन्हात आपलीच अवस्था कशी सारखी तहान-तहानलेली होते. मग त्यांना किती तहान लागत असेल बरं?! म्हणूनच एका भांडयात पाणी भरून ते भांडे गॅलरीच्या कट्टयावर, कुंडयांच्या स्टँडवर, खिडकीजवळ किंवा अगदी दाराजवळही ठेवू शकता. पण अंगणात किंवा दाराजवळ असं भांड ठेवल्यास होतं काय की, जेव्हा पक्षी पाणी प्यायला येतात, तेव्हा मांजरी-बोके त्यांच्यावर हल्ला करतात, त्यासाठीच शक्यतो ते भांड हँगिंग स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न करा. किंवा एखाद्या टेबलावर उंचावरही ठेवता येतं. इथेही सजावटीच्या तुमच्या कल्पकतेला वाव आहेच.

फक्त एक लक्षात ठेवा की, ते भांड खोलगट नव्हे तर पसरट असावं. नाही तर त्या पक्ष्यांची अवस्था आपल्या गोष्टीतल्या कावळ्यासारखी व्हायची! दुसरी गोष्ट अशी की, अनेकदा कावळा हा पक्षी भाकरीसारखं एखादं अन्न त्या पाण्यात बुडवून खातो. त्यामुळे ते पाणी खराब होतं. शिवाय सतत भांडयात पाणी राहिल्याने शेवाळाचीही निर्मिती होते. त्यामुळेच पाणी वेळोवेळी बदलत राहावं व भांडंही स्वच्छ ठेवावे.

आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यातून खूप बक्षिसं कमावली असतील, आज मात्र या मुक्या पक्ष्यांचे नि:शब्द आशीर्वाद मिळवू.आपण सर्वांनी एकत्रित येऊन या लोकचळवळीचा भाग व्हा असे आव्हान संभाजी ब्रिगेड विध्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख यांनी केले आहे..

प्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड 9960292121
9420352121

No comments:

Post a comment