तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 March 2019

अभ्यासपूरक उपक्रमांतूनच व्यक्तीमत्व फुलते : अनिल कुलकर्णी


तालुकास्तरीय चित्रकला व निबंधस्पर्धेचे सेलूत बक्षिस वितरण 

प्रतिनिधी

सेलू : शालेय जीवनात विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त कलागुणांना विकसित करण्याची संधी मिळत असते. ती दवडू  नये. अशा अभ्यासपूरक उपक्रमांतूनच व्यक्तीमत्व फुलण्यास चालना मिळते, असे प्रतिपादन नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांनी मंगळवारी (ता.१३) येथे केले. 
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन  आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण येथील नूतन विद्यालयात संपन्न झाले. त्यावेळी श्री.कुलकर्णी बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्री.सरदार, डी.के.कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अशोक गाजरे, पर्यवेक्षक मा.मा.सुर्वे, रामकिशन मखमले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्राथमिक गटात पाचवी ते आठवी चित्रकला स्पर्धेत प्रथम नचिकेत आढे, साक्षी राऊत द्वितीय, तृतीय विजयश्री गाडेकर, तर निबंध स्पर्धेत सिध्दी बोराडे प्रथम, मधुरा नांदापूरकर द्वितीय, तर तृतीय श्रध्दा डख
माध्यमिक गटात चित्रकला स्पर्धेत मनिष जोशी प्रथम, वैष्णवी काळे द्वितीय व तृतीय अस्मिता सावंत , तर निबंध स्पर्धेत प्रांजली कदम प्रथम, प्रतिक्षा गात द्वितीय आणि तृतीय यश जाधव हे स्पर्धक विजेते ठरले.
दोन्ही गटासाठी प्रथम रोख एक हजार रुपये, द्वितीय पाचशे रुपये व तृतीय  २५० रूपये आणि प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच डॉ.होमी भाभा संशोधन संस्थेने घेतलेल्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन श्रावणी गोरेचे कौतुक करण्यात आले. 
प्रास्ताविक तालुका संयोजक किशोर कटारे, सूत्रसंचालन संयोजक सुरेश हिवाळे यांनी केले तर फुलसिंग गावीत यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment