तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

परभणी शहरातील फर्निचर शोरूमला आग , आगीत लाखोंचा माल जळून खाक
प्रतिनिधी
परभणी:-शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या, फर्निचर शोरूमला आग लागल्याची घटना घडली असून, घटनेत शोरूम मधील लाखो रुपयांचा माल जळून राख झालाय. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. शहरातील परभणी - जिंतूर महामार्गावर असलेल्या , वूड्स या तीन मजली शोरूमला दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने संपूर्ण दुकान वेढून टाकले. आगीचे लोट आणि धुरामुळे शहरातील अन्य भागातूनही ही आग दिसत होती. पण वेळीच अग्निशमन विभागाला बोलवण्यात आल्याने , आगीवर नियंत्रण मिळवता आले. महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग विझवली. विशेष म्हणजे या शोरूमच्या बाजूलाच असलेल्या दवाखाना आणि घरानाही या आगीचा फटका बसला,  घराला ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment