तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

अभिनव विद्यालय येथे अंतराळवीर कल्पना चावला जयंतीनिमित्त अभिवादन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- १७ 
     ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय  परळी येथे संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय मूळची पहिली महिला अंतराळवीर भारतकन्या कल्पना चावला यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कल्पना चावला ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला. या प्रवासातून परत येताना १ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्‍या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती सहशिक्षक इम्रान खान यांनी दिली यावेळी सहशिक्षक संतोष मुंडे, आदित्य बायस्कर, संजय मुंडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment