तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 March 2019

परळीत मोटार सायकल पळवली


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.13
    येथील हाडबे हॉस्पिटल रोडवर लावलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना दि.08 मार्च रोजी घडली. या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात आरोपी विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्हेरवाडी येथील किराणा दुकानदार सुरेश बालासाहेब मुंडे हे परळीच्या हाडबे रोडवर गाडी लावून फाऊंडेशन स्कुल कडे गेले होते. तेवढ्यात त्यांची गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. मोटार सायकलचा क्रमांक एम.एच.44 ई 2674 असा आहे. या प्रकरणाचा तपास जमादार बापु लांडगे करीत आहेत. 
    शहरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावूनही मोटार सायकल चोरीचे प्रमाण कमी होण्या ऐवजी वाढले आहे.

No comments:

Post a Comment