तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

दहावी,बारावी पास सुशिक्षित बेरोजगारांना नौकरीची संधी;पाथरीत नौकरी मेळाव्याचे आयोजनप्रतिनिधी
पाथरी:-जय भवानी उद्योग समुह चिंचवड, चाकण पुणे. आणि जन्मभुमी फाउंडेशन पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी १२ व व्यवसायिक ( आय टी आय ) पदवीका धारकां साठी दिनांक ०७ मार्च २०१९ गुरुवार रोजी सकाळी ११ : ०० वाजता पाथरी येथील पंचायत समिती सभागृहात भव्य नौकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या नौकरी मेळाव्याचे उदघाटन नगर परिषद गट नेते जुनैद भैय्या दुर्रानी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी शेतीनिष्ठ शेतकरी तथा जन्मभुमी फाउंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात हे राहाणार आहेत तर मुख्य अतिथी म्हणुन रंगनाथराव गोडगे व्यवस्थापकीय संचालक जय भवानी उद्योग समुह चिंचवड चाकण, विशेष अतिथी म्हणुन छगन दादा शेरे  - उपाध्यक्ष मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश आदी मान्यवरांची उपस्थिति लाभणार आहे.
तर मेळाव्यात नौकरी साठी आलेल्या सुशिक्षित बेरोजगारांची निवड चंद्रशेखर कडलग , कमलाकर वाघ  आणि संतोष काळे ही मान्यवर मंडळी करणार आहेत. या वर्षीही पाथरी तालुक्या सह परभणी जिल्हा आणि मराठवाड्यात दुष्काळ असल्याने शेतकरी,कष्टकरी, यांच्या पाल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या साठी या नौकरी मेळाव्याचे आयोजन केले असूनमेळाव्यातनौकरी साठी येणा-या उमेदवारांना अल्पोपहारआणि निवड झाल्या नंतर पाथरी येथून पुणेयेथे जाण्याची व्यवस्था कंपनी  मार्फत करण्यात येणार आहे.पुणे या ठिकाणी निवड झालेल्या सर्वांची  राहाण्याचीही व्यवस्था कंपनी मार्फत करण्यात येणार आहे.या नौकरी मेळाव्याचा जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन जन्मभूमी फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment