तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 March 2019

कान्सूर ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुक मतदानावर बहिष्कार;विमा नाकारल्याने ग्रा पं ने घेतला ठराव;पाथरी तहसिलदारांना निवेदन

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-तालुक्यात राज्य शासनाने दुष्काळ जाहिर केला आहे. २०१७-१८आणि २०१८-१९ या वर्षात सलग दोन वेळाही बाभळगाव मंडळात सरासरीच्या पन्नास टक्के पेक्षा कमी पाऊस झाला.परिणामी खरीप हंगामातील संपुर्ण पिके हातची गेली मात्र शासनाने  नियुक्त केलेल्या विमा कंपनीने या भागातील शेतक-यांच्या  तोंडाला पाने पुसत खरीप हंगामातील विमा न दिल्याने सोमवारी कान्सूर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येत या विषयी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन विमा मंजूर न केल्यास लोकसभे साठीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव एकमताने घेऊन या विषयीचे निवेदन पाथरी तहसिलदार यांना देण्यात आल्याने कान्सुर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने शेतकरी हिता साठी घेतलेल्या या निर्णयाचे तालुक्यातील शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे.
नाक दाबल्या शिवाय तोंड उघडत नाही अशी काहिशी गत आता शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे.२०१७ च्या विम्या साठी जिल्ह्यातील शेतकरी अजुनही संघर्ष करत आहे.शासन स्तरावर वेळोवेळी शेतकरी नेते यांनी शेतक-यां सह बैठका घेतल्या आता विमा प्रश्न मार्गी लागेल असे सांगितले गेले. मंत्र्यांनी दुरचित्रवाणी वर बातम्या दिल्या मात्र या केवळ घोषणाच राहील्या.परभणीत जवळपास महिना भर आंदेलने चालले.मात्र विमा मंजुर झाला नाही.त्यातच पुन्हा पाथरी तालुक्यात पावसा अभावी २०१८चा  संपुर्ण खरीप हंगाम वाया गेला.यात सर्वात कमी पर्जन्यमान बाभळगाव मंडळात झाले मात्र तालुक्यातील तीनही मंडळात दुष्काळ असतांना जाणिव पुर्वक विमा नामंजुर करण्यात आल्याची भावना पुन्हा शेतक-यां मध्ये तिव्र होत असून सोमवार १८ मार्च रोजी कान्सूर ग्रामपंचायती ने विषेश सभेचे आयोजन करून यात या वेळी बाभळगाव मंडळात पिक विमा नामंजुर केल्याने येत्या लोकसभे साठी मतदान करणार नसल्याचा ठराव घेतला. या साठी उप सरपंच अनंत शिवाजी काकडे यांनी सुचना केली तर सौ सावित्रा शिंदे यांनी अनुमोदन दिले.या वेळी सरपंच संदिप शिंदे, उप सरपंच अनंता काकडे, सदस्य सौ. सावित्री शिंदे, सौ जया शिंदे, सोपान शिंदे, राजेभाऊ गरड, सौ कुसूम हिवरकर या सदस्यांची उपस्थिती होती या नंतर लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०१९  वर विमा मंजुर न झाल्याने बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन पाथरीच्या तहसिलदार भाग्यश्री देशमुख यांना देण्यात आले.यावेळी सरपंच संदिप शिंदे यांच्या सह ग्रापं सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. या विषयी तालुका कृषी अधिकारी शिंदे यांच्या शी संपर्क केला असता जिल्हा स्तरावरून या विषयी माहिती मिळाल्यावर सांगता येईल असे असमाधान कारक उत्तर दिले.

No comments:

Post a Comment